शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

जिवावर उदार हाेऊन मृतदेह हाताळणाऱ्यांना केवळ ३५० रुपये दाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 05:00 IST

काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत सक्रिय काेराेना रुग्णांचा आकडा चार हजारापर्यंत गेला हाेता. एवढ्या रुग्णांना सेवा देऊ शकेल एवढी आराेग्य यंत्रणा जिल्ह्यात नसल्याने काही कंत्राटी कर्मचाऱ्यांची त्रयस्त संस्थेमार्फत नेमणूक करण्यात आली आहे. गडचिराेली जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये जवळपास १०० कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर नेमण्यात आले आहेत. काेराेना हा अतिशय संसर्गजन्य राेग आहे. लागण झालेल्या अनेकांचा जीव या राेगामुळे गेला आहे.

ठळक मुद्देकाेराेनाची लाट ओसरताच हाेणार बेराेजगार

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन काही कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक त्रयस्त संस्थेमार्फत रुग्णालयांमध्ये करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना काेराेनामुळे मरण पावलेल्या नागरिकांचे मृतदेह हाताळण्यापासून विविध कामे करावी लागतात. मात्र त्यांना कंपनीमार्फत दिवसाची ३५० रुपये मजुरी दिली जाते. काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत सक्रिय काेराेना रुग्णांचा आकडा चार हजारापर्यंत गेला हाेता. एवढ्या रुग्णांना सेवा देऊ शकेल एवढी आराेग्य यंत्रणा जिल्ह्यात नसल्याने काही कंत्राटी कर्मचाऱ्यांची त्रयस्त संस्थेमार्फत नेमणूक करण्यात आली आहे. गडचिराेली जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये जवळपास १०० कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर नेमण्यात आले आहेत. काेराेना हा अतिशय संसर्गजन्य राेग आहे. लागण झालेल्या अनेकांचा जीव या राेगामुळे गेला आहे. त्यामुळे समाजमनावर या राेगाविषयी एक प्रकारची भीती आहे. या रुग्णांना सेवा देण्याचे काम हे कंत्राटी कर्मचारी करीत आहेत. मात्र दिवसाला केवळ ३५० रुपये एवढेच मानधन दिले जाते.या कर्मचाऱ्यांना केवळ तीन महिन्यांसाठी ठेवले जाणार आहे. काेराेनाचा प्रभाव कमी हाेताच काढून टाकले जाणार आहे. त्यामुळे सेवेचीही काही खात्री नाही. तीन महिन्यांच्या राेजगारासाठी जीवावर बेतणारी कामे या कंत्राटी मजुरांना करावी लागत आहेत.

पाेट भरेल एवढे पैसे द्या n काेराेनाची भीती साऱ्या जगाने घेतली आहे. काेराेनाचा रिपाेर्ट पाॅझिटिव्ह येताच सख्खे नातेवाईकही परक्याप्रमाणे वागू लागतात. अशा स्थितीत त्यांना सेवा देण्याचे काम आमच्याकडून हाेते. अतिशय जाेखमीचे काम असल्याने त्यासाठी पाेट भरेल एवढे तरी मानधन मिळणे अपेक्षित हाेते. मात्र प्रत्यक्षात केवळ ३५० रुपयेच हातात दिले जातात.n कंत्राटदाराने १२ हजार रुपये मानधन देण्याचा करार केला आहे. मात्र प्रत्यक्षात केवळ ९ ते १० हजार रुपये एवढेच मानधन दिले जाते. 

कंपनीने ठरविल्यापेक्षा कमी मिळते मानधन

काेराेनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला सेवा देण्याचे धाेकादायक काम आमच्याकडून करवून घेतले जाते. त्यासाठी किमान २० हजार रुपये मासिक मानधन मिळणे अपेक्षित हाेते. मात्र १२ हजार रुपये मानधन रुपये देण्याचा करार केला आहे. प्रत्यक्षात केवळ ९ ते १० हजार रुपये एवढेच मानधन दिले जात आहे.- कंत्राटी कर्मचारी 

काेराेनाच्या काळात राेजगार नसल्याने नाईलाजास्तव हा राेजगार स्वीकारावा लागला आहे. आठ तास राबवून घेतले जाते. विशेष म्हणजे केेवळ तीनच महिन्यांसाठी राेजगार आहे.-कंत्राटी कर्मचारी 

काय काम करावे लागतेकाेराेना मृत्यू झालेल्या व्यक्तीचे शव प्लॅस्टिकमध्ये सील बंद करणे. हे शव शववाहिकेपर्यंत पाेहाेचविणे. आराेग्य कर्मचाऱ्यांना मदत करणे. एखादा रुग्ण ऑक्सिजनवर असेल तर त्याला मदत करणे. आदी कामे या कर्मचाऱ्यांना करावी लागतात.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUnemploymentबेरोजगारी