शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली जिल्ह्यात वरिष्ठ व निवड श्रेणीच्या प्रशिक्षणासाठी केवळ एक केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 18:32 IST

Gadchiroli : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव : शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी जिल्ह्यात फक्त गडचिरोली येथे कारमेल हायस्कूलमध्ये एकमेव केंद्र आहे. अनेक दूरवरच्या तालुक्यातून शिक्षक शेकडो किलोमीटरवरून येजा करत आहेत. हे प्रशिक्षण १० दिवस पूर्ण करावे लागत आहे. दरम्यान प्रशिक्षणार्थी शिक्षकांची चांगलीच धांदल उडत आहे.

बाहेरगावावरून गडचिरोलीला येताना शिक्षकांना दोन पाच मिनिटांचा उशीर होऊ शकतो. पण सकाळी नऊ वाजून ३० मिनिटांनी ऑनलाइन हजेरी होत असल्याने व एखादा शिक्षक दोन मिनिटं उशीर जरी आला तरी पण त्याला प्रशिक्षण वर्गातून बाहेर पडावे लागत असल्याकारणाने त्यांनी भरलेली प्रशिक्षणाची फी सुद्धा बुडत असून त्यांना या प्रशिक्षणाची पुन्हा एक वर्ष वाट पाहावी लागणार आहे.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकाचे प्रशिक्षण आयोजित केले जातात ही बाब नित्याचीच झाली आहे परंतु ज्या शिक्षकांना सेवेत २४ वर्षांपेक्षा जास्त काळ व्यतीत केला, अशा शिक्षकांना निवड वेतनश्रेणी व ज्या शिक्षकांना बारा वर्षांपेक्षा अधिक काळ सेवेला झाला असता अशांना वरिष्ठ निवड श्रेणीचे प्रशिक्षण कारमेल हायस्कूल गडचिरोली येथे सुरू आहे. येथे जिल्ह्यातील शिक्षक हजेरी लावत आहेत. 

चार वेळा नोंदवावी लागते ऑनलाइन हजेरीया वर्षीपासून हे प्रशिक्षण ऑफलाइन होत असून हजेरी मात्र दिवसातून चार वेळा ऑनलाइन होत आहे. सकाळी ९:३० त्याने पहिली हजेरी होत असते. दोन मिनिटं प्रशिक्षणाला उशीर जरी झाला तरी पण त्या शिक्षकाला पूर्ण दहा दिवसांच्या प्रशिक्षणालाच मुकावे लागत आहे. शिक्षकाने भरलेली प्रशिक्षणाची फीसुद्धा वाया जाणार आहे.

शिक्षक म्हणतात, मानसिक त्रास होतोययापूर्वी निवड व वरिष्ठ श्रेणीचे प्रशिक्षण ऑनलाइन झाले यातून शिक्षकांनी व्यक्तिमत्त्वाचे धडे व शास्त्रीय दृष्टिकोन विकसित केले. नवीन पिढी घडविण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षकावर आहे त्यामुळे त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते, हे जरी स्वागतार्ह असले तरी शेकडो किलोमीटरवरून ये जा करणाऱ्या शिक्षकासाठी मात्र हे प्रशिक्षण मानसिक त्रास देणारे ठरत आहे.

"निवड श्रेणी प्रशिक्षण घेणारे शिक्षक हे सेवेला चोवीस वर्षेपेक्षा जास्त कालावधी झालेले आहेत. या शिक्षकांसाठी जिल्ह्यात एकच प्रशिक्षण केंद्र असल्याने त्यांना दहा दिवस मनस्ताप होत आहे. त्यासाठी हे प्रशिक्षण ऑनलाइनच व्हावे जेणेकरून त्यांना या एकविसाव्या शतकात ऑनलाइन शिक्षणाशी जोडून घेता येईल. याबाबत अधिकाऱ्यांनी विचार करावा."- अजय लोंढे, जिल्हा कार्यवाह, विदर्भमाध्यमिक शिक्षक संघ, गडचिरोली.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली