शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक व दुचाकीच्या अपघातात एक ठार, चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 23:25 IST

चामोर्शी तालुक्यातील आष्टी व सिरोंचा तालुक्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एक जण जागीच ठार तर एक गंभीर व तीन किरकोळ जखमी झाल्याची घटना गुरूवारी उघडकीस आली.

ठळक मुद्देरोमपल्ली फाटा व चौडमपल्लीनजीकची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा/आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी व सिरोंचा तालुक्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एक जण जागीच ठार तर एक गंभीर व तीन किरकोळ जखमी झाल्याची घटना गुरूवारी उघडकीस आली.सिरोंचा-आलापल्ली मार्गावर असलेल्या रोमपल्ली फाट्याजवळ बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एक इसम जागीच ठार झाल्याची घटना मुख्यालयापासून २२ किमी अंतरावर घडली. प्राप्त माहितीनुसार, वेंकय्या लक्ष्मय्या अग्गुवार (३७) रा. सुपाका (तेलंगणा) हे आलापल्लीवरून सिरोंचाकडे येत होते तर लक्ष्मण चंद्रय्या कुळमेथे (२७) रा. वडदेल्ली हे सिरोंचा येथील काम आटोपून झिंगानूरकडे जात असताना दोन दुचाकीस समोरासमोर धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात वेंकय्या लक्ष्मय्या अग्गुवार हा जागीच ठार झाला. दुसऱ्याला रात्री ८ वाजताच्या दरम्यान ग्रामीण रुग्णालय सिरोंचा येथे रुग्णवाहिकेने आणले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी तेलंगणा येथील रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेचा पुढील तपास बामणी पोलीस करीत आहे.आलापल्लीवरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या ट्रकने आष्टीवरून बोरीकडे जाणाºया दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील तिघे जण किरकोळ जखमी झाल्याची घटना गुरूवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास चौडमपल्ली येथील वन विभागाच्या कार्यालयासमोर घडली. चंद्रपूर येथील श्रीराम ट्रान्सपोर्ट कंपनीचा एमएच ३४ एम ५०१६ क्रमांकाचा ट्रक चंद्रपूरकडे येत होता. कोनसरी येथून पेंटा दिना पानेमवार हा अन्य दोघांसोबत रामपूर (बोरी) येथे दुचाकीने जात होता. दरम्यान ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे पेंटा दिना पानेमवारसह पत्नी निता पानेमवार, सुवर्णा गुरूदास गुरूनुले हे तिघे जण जखमी झाले. त्यांच्यावर आष्टीच्या रूग्णालयात उपचार सुरू आहे.दुचाकीवरून पडून एकाचा मृत्यूगडचिरोली येथून अहेरीकडे दुचाकीने जात असताना मागे बसलेले अमोल बाबुराव वडनेरवार यांना हृदय विकाराचा झटका आल्याने ते खाली पडले. यात त्यांचा मृत्यू झाला. सदर घटना आष्टी येथील पेट्रोलपंपाजवळ गुरूवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

टॅग्स :Accidentअपघात