शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सलग दुसऱ्या दिवशी वाघाने साधला डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2022 23:07 IST

रामाळा- वैरागड मार्गावरील कक्ष क्रमांक ४१ मधील जंगलात सिंध कापण्यासाठी गेले होते. तिघेही जवळजवळ सिंध कापण्यात व्यस्त  होते. मात्र, लवकरच त्यांच्या दोन सोबत्यांची सिंध कापून झाली; परंतु, आनंदराव दुधबळे हे वयाेवृद्ध असल्याने त्यांची पुरेशी सिंध कापून झाली नाही. ते एकटे असल्याचे पाहून झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केले. दुपारी एक वाजता मृतदेह सापडला, तेव्हा वाघाने आनंदरावचा उजवा हात फस्त केला हाेता.

लाेकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : धानाचे भारे बांधण्यासाठी लागणारी सिंध आणण्यासाठी दोन सहकाऱ्यांसाेबत जंगलात गेलेल्या शेतकऱ्याला वाघाने ठार केले. ही घटना आरमाेरी तालुका मुख्यालयापासून अगदी १० किमी अंतरावरील रामाळा जंगलातील कक्ष क्रमांक ४१ मध्ये शनिवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली. शुक्रवारी एका गुराख्याचा बळी घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा वाघाने हल्ला केल्यामुळे नागरिकांसह वनविभागाचे अधिकारीही चक्रावून गेल्या आहेत. चालू वर्षातील ही १७ वी घटना आहे.आनंदराव पांडुरंग दुधबळे (६५, रा. रामाळा) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. आनंदराव पांडुरंग दुधबळे हे आपल्या दोन सहकाऱ्यांसाेबत शनिवारी सकाळी सायकलने रामाळा- वैरागड मार्गावरील कक्ष क्रमांक ४१ मधील जंगलात सिंध कापण्यासाठी गेले होते. तिघेही जवळजवळ सिंध कापण्यात व्यस्त  होते. मात्र, लवकरच त्यांच्या दोन सोबत्यांची सिंध कापून झाली; परंतु, आनंदराव दुधबळे हे वयाेवृद्ध असल्याने त्यांची पुरेशी सिंध कापून झाली नाही. ते एकटे असल्याचे पाहून झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केले. दुपारी एक वाजता मृतदेह सापडला, तेव्हा वाघाने आनंदरावचा उजवा हात फस्त केला हाेता. वडसाचे सहायक वनसंरक्षक मनोज चव्हाण, आरमोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम, क्षेत्रसहायक राजेंद्र कुंभारे, वनरक्षक भारत शेंडे, कमलेश गिन्नलवार, विकास शिवणकर आदींनी घटनास्थळी पंचनामा केला. तसेच बेड व ट्रॅप कॅमेरे लावले. 

...अन् सहकारी हाक मारतच राहिले आनंदराव दुधबळे यांच्यासाेबत जंगलात सिंध कापण्यासाठी गेलेल्या दाेन सहकाऱ्यांची सिंध कापून झाली. तेव्हा त्यांनी आनंदरावला मोठमोठ्याने हाक मारली; परंतु, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. तरीही त्यांनी काही वेळ आवाज दिला व शाेधसुद्धा घेतला. त्यानंतर मात्र त्यांना वाघहल्ल्याचा संशय आल्याने दोघेही गावात परतले. सर्व हकीकत सांगितल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहीम राबविली असता दुपारी आनंदरावचा मृतदेह सापडला. सिंध कापण्याच्या स्थळापासून जवळपास दाेन किमी अंतरापर्यंत वाघाने आनंदरावला फरफटत नेले हाेते.

वाघांना पकडण्यासाठी ताडाेबा व अमरावतीतील टीम दाखल

आरमाेरी : सलग दाेन दिवस आरमाेरी तालुक्यात दाेघांचा बळी घेणाऱ्या वाघांना पकडण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडाेबा व अमरावती येथील रेक्स्यू टीम वडसा वनविभागात दाखल झाली. सदर टीम वाघांना पकडण्यासाठी कसाेसीचे प्रयत्न करणार आहे.वडसा वनविभागातील आरमोरी, पाेर्ला वन परिक्षेत्रातील जंगल परिसरात अनेक लोकांचा बळी सीटी-१ वाघाने घेतला. या वाघाला जेरबंद करण्यासाठी ताडोबा येथील रेस्क्यू टीम आली आहे. तर कुरंजा येथील ठेमाजी माधव आत्राम ह्या गुराख्याचा बळी टी- ६ या वाघाने घेतला असल्याची खात्री पटल्यानंतर शुक्रवारी उशिरा वनविभागाने टी-६ वाघाला जेरबंद करण्याचे आदेश काढले. त्यानंतर त्याला पकडण्यासाठी अमरावतीवरून रेस्क्यू टीम बोलविण्यात आली. ही टीम शनिवारी पाेर्ला वनपरिक्षेत्रात दाखल झाली. दोन्ही टीम वाघाला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. डॉ. किशोर मानकर यांनी पाेर्ला वनपरिक्षेत्रात टी- ६ वाघाला जेरबंद करण्यासाठी उपयोजना करण्याच्या सूचना दिल्या.

वनसंरक्षक डॉ. मानकर यांनी केली पाहणीगडचिरोलीचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर व वडसाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी रामाळा जंगल परिसरात तीन किलोमीटर आत जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. तसेच ट्रॅप कॅमेऱ्याद्वारे वाघाची ओळख पटवावी, गस्त वाढवा, गावागावात दवंडी देऊन लोकांना जागृत करावे, मुख्यालयी राहून काम करा, अशा  सूचना  वन कर्मचाऱ्यांना देत एकूणच परिस्थितीची माहिती जाणून घेतली. 

दुधबळे कुटुंबाला ३० हजारांची मदतवाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या आनंदराव दुधबळे यांच्या कुटुंबाला वनविभागातर्फे तातडीची ३० हजार रुपयांची सानुग्रह मदत देण्यात आली. तसेच जंगलात वाघाचा वावर असल्याने कुणीही आत जाऊ नये, शेतावर जाताना योग्य खबरदारी घेऊन शेतीची कामे करावीत, असे आवाहन वनविभागाने केले.

 

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग