शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

अधिकाऱ्यांनी निवडणूक कामासाठी केली दिवस-रात्र एक

By admin | Updated: October 18, 2014 23:24 IST

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात विधानसभा निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कठोर परिश्रम घेतले. त्यांच्या परिश्रमामुळे जिल्ह्यात चांगल्या वातावरणात नियोजनबद्ध पद्धतीने

गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात विधानसभा निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कठोर परिश्रम घेतले. त्यांच्या परिश्रमामुळे जिल्ह्यात चांगल्या वातावरणात नियोजनबद्ध पद्धतीने निवडणुका पार पडू शकल्या. हे आता स्पष्ट झाले आहे. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलिंग पार्ट्या पाठविण्याच्या कामासह मतदानाची टक्केवारी टिकवून ठेवणे व पोलिंग पार्ट्या परत आल्यानंतर ईव्हीएम संग्रहीत करून घेणे या कामासाठी प्रशासकीय यंत्रणा दिवस-रात्र राबली. जिल्हाधिकारी कार्यालयाचा निवडणूक विभाग, उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी कठोर परिश्रम घेतले. लोकसभा निवडणुकीतही जिल्हा निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक काम केले. विधानसभा निवडणुकीतही त्यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामासाठी लागून होती. नागरिकांकडून तसेच माध्यमांकडून येणाऱ्या सूचनांवरही त्यांनी तत्काळ दखल घेत आवश्यक ते बदल केलेत. गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात मतदानाची वेळ २००९ पासून दुपारी ३ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. या कालावधीत चांगले मतदान व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी जनजागृतीवर मोठा भर दिला. गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदा मतदानासाठी व्यापक जनजागृती मोहीम गावपातळीवर राबविण्यात आली. त्यामुळे नक्षलग्रस्त भागातही चांगले मतदान होऊ शकले. देसाईगंज, गडचिरोली, अहेरी या तिनही ठिकाणच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनीही निवडणूक कामासाठी गेल्या २०-२२ दिवसांपासून प्रचंड मेहनत घेऊन काम केले. त्यामुळे जिल्ह्यात कुठेही फेरमतदान घेण्याची वेळ आली नाही. या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही निवडणूक कामासाठी परिश्रमपूर्वक काम केले. त्यामुळेच गडचिरोली जिल्ह्यात मतदानाची टक्केवारीही वाढली.पोलीस यंत्रणेने प्रशासकीय यंत्रणेला चांगली साथ देत दुर्गम गावातही मोठे मतदान व्हावे, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या. त्यामुळे चांगले मतदान अहेरी विधानसभा क्षेत्रात होऊ शकले. या सर्व निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासनाचे परिश्रम निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)