शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

फ्रिजवाल गाई प्रकरणात अधिकारीही दोषी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 05:01 IST

सात महिन्यांपूर्वी या प्रकरणी लोकमतने वृत्तमालिका सुरू केल्यानंतर जानेवारी महिन्यात पोलिसांनी प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीच्या संचालकांवर भादंवि कलम ४०६, ४६५, ४६८, ४७१, ४२०, १२० (ब) नुसार गुन्हे दाखल केले. त्यापैकी एका संचालकाला त्याचवेळी अटक केली तर तिघांना ३ जुलै रोजी अटक करून चार दिवसांची पोलीस कोठडीही मिळवली होती.

ठळक मुद्देडोळेझाकपणाने गाई दिल्या कशा? : आतापर्यंत केवळ कंपनीच्या संचालकांवरच कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतकऱ्यांची कंपनी दाखवून पुण्यातील लष्कराच्या कॅम्पमधील महागड्या फ्रिजवाल गाई लाटण्याच्या प्रकरणात आरमोरी पोलिसांनी प्रोग्रेसिव्ह फार्मर्स आॅफ गोंडवाना लिमीटेड या कंपनीच्या चार संचालकांना आतापर्यंत अटक करून त्यांची चौकशी केली. मात्र या कंपनीला कोट्यवधीच्या महागड्या गाई मिळवून देण्यात हातभार लावून एक प्रकारे शासनाच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. या प्रकरणात सदर कंपनीएवढेच त्या कंपनीला डोळेझाकपणे मदत करणारे अधिकारीही दोषी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.सात महिन्यांपूर्वी या प्रकरणी लोकमतने वृत्तमालिका सुरू केल्यानंतर जानेवारी महिन्यात पोलिसांनी प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीच्या संचालकांवर भादंवि कलम ४०६, ४६५, ४६८, ४७१, ४२०, १२० (ब) नुसार गुन्हे दाखल केले. त्यापैकी एका संचालकाला त्याचवेळी अटक केली तर तिघांना ३ जुलै रोजी अटक करून चार दिवसांची पोलीस कोठडीही मिळवली होती. आतापर्यंतच्या तपासात पोलिसांनी सदर कंपनीकडून शासनाची कशी फसवणूक झाली याची माहिती मिळवली, मात्र या प्रकरणात पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांचे कंपनीला अप्रत्यक्षपणे पाठबळ तर नव्हते ना? या दिशेनेही तपास करणे गरजेचे झाले आहे.भारतीय लष्कराच्या फ्रिजवाल जातीच्या दुधाळू गाई सदर कंपनीच्या ताब्यात देताना अनेक बाबींची पडताळणी झालेली नाही. विशेष म्हणजे ज्या कंपनीचे रजिस्ट्रेशनच झालेले नाही, त्या कंपनीला गाई देण्याचा प्रस्ताव पाठवला कुणी, आणि तो पशुसंवर्धन विभागाने कोणत्या आधारावर मंजूर केला याची तपासणी केल्यास गडचिरोली ते पुणे पशुसंवर्धन आयुक्तालयापर्यंतच्या अधिकाºयांचा बेजबाबदारपणा स्पष्टपणे समोर येईल.ही सर्व प्रक्रिया इतकी तडकाफडकी करण्यात आली की गाई मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवला त्यावेळी कंपनीची नोंदणीही झालेली नव्हती. पण असे असताना पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही पडताळणी न करता या कंपनीला गाई वाटपाचा निर्णय घेतला कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे.पैसे शासनाचे, अधिकार कंपनीचे?पुण्यातील लष्कराच्या कॅम्पमधून सदर गाई गडचिरोली जिल्ह्यात आणताना भरण्यात आलेली नाममात्र रक्कमही कंपनीने न भरता पशुसंवर्धन आयुक्तांनी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ अकोला यांच्या खात्यातून भरली होती, अशी माहिती मिळाली आहे. कंपनीच्या ताब्यात गाई देताना शासनाच्या विभागाने पैसे भरण्याचे कारण काय? आणि जर असे असेल तर त्या गाईंवर शासनाच्या पशुसंवर्धन विभागाऐवजी कंपनीने अधिकार कसा गाजवला? याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. या प्रकारामुळे सदर कंपनीशी वरिष्ठ अधिकाऱ्याचे हितसंबंध जुळले असण्याची दाट शंका उपस्थित केली जात आहे.शेतकरी लाभार्थ्यांची निवड करताना सर्वसमावेशकता नाहीगाई वाटपाच्या लाभार्थ्यांची निवड करताना देसाईगंज, आरमोरी आणि कुरखेडा या तालुक्यातील लाभार्थ्यांची निवड करावी, असे पशुसंवर्धन आयुक्तांचे आदेश होते. पण प्रत्यक्षात सदर कंपनीचे भागधारक दाखविलेले लाभार्थी केवळ देसाईगंज तालुक्यातील दाखविण्यात आले. त्यामुळे ही यादी कोणाच्या निर्देशाने तयार करण्यात आली आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी त्याची शहानिशा का केली नाही? याची चौकशी होणे गरजेचे आहे.

टॅग्स :cowगाय