शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीच्या १८३ अर्जांवर आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 23:34 IST

चावडी वाचनादरम्यान जिल्हाभरातील १८३ कर्जमाफीच्या अर्जांवर आक्षेप घेण्यात आले आहेत. यानंतर आता तालुकास्तरावर आक्षेप नोंदविता येणार आहेत.

ठळक मुद्देचावडी वाचन पूर्ण : यादीत नाव नसल्याने अनेकांचा गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चावडी वाचनादरम्यान जिल्हाभरातील १८३ कर्जमाफीच्या अर्जांवर आक्षेप घेण्यात आले आहेत. यानंतर आता तालुकास्तरावर आक्षेप नोंदविता येणार आहेत.कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आॅनलाईन अर्ज भरणे आवश्यक करण्यात आले होते. जिल्हाभरातील ६५ हजार ६४९ शेतकºयांनी कर्जमाफीचे अर्ज भरले. शासकीय कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार नाही, असे शासनाने घोषित केले असतानाही काही शासकीय कर्मचाºयांनी कर्जमाफीसाठी अर्ज केले होते. चावडी वाचनादरम्यान गावातील नागरिकांनी संबंधितांच्या अर्जावर आक्षेप घेतले. २९ सप्टेंबर ते ७ आॅक्टोबर या कालावधीत गावस्तरावर चावडी वाचन घेण्यात आले. यामध्ये १८३ अर्जांवर नागरिकांनी आक्षेप घेऊन सदर अर्ज रद्द करण्याची मागणी केली आहे.काही शेतकºयांनी कर्जमाफीचे अर्ज भरले, मात्र त्यांची नावे यादीमध्ये नसल्याने काही गावांमध्ये गोंधळ निर्माण झाला. ज्या शेतकºयांनी अर्ज केला आहे, मात्र यादीमध्ये नाव नाही, अशा शेतकºयांना तहसीलदारांकडे केलेल्या अर्जाची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सरकारने पुन्हा नवीन सॉप्टवेअर तयार केले असून यामध्ये शेतकºयांची तीन याद्यांमध्ये विभागणी केली जाणार आहे. यातील हिरव्या रंगाची यादी पात्र लाभार्थ्यांची राहणार आहे. पिवळ्या रंगाच्या यादीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात अपात्र ठरविलेले अर्जदार तर लाल रंगाच्या यादीमध्ये कायमस्वरूपी अर्ज रद्द केलेल्या नागरिकांचा समावेश राहणार आहे. जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीची आचारसंहिता लावण्यात आली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीमध्ये चावडी वाचनाचा कार्यक्रम लांबणीवर टाकण्यात आला आहे. ५० गावांमध्ये अजूनही चावडीवाचन झाले नाही. काही गावांमध्ये चावडीवाचन झाले आहेतहसीलदारांकडेही नोंदविता येणार आक्षेपकाही गावांमध्ये नागरिकांनी अर्जांबाबत तोंडी आक्षेप नोंदविले आहेत. तोंडी आक्षेप ग्राह्य धरले जाणार नसून त्यासाठी संबंधित व्यक्ती कसा अपात्र आहे, याबाबतचे योग्य पुरावे जोडणे आवश्यक आहे. पुराव्याअभावी अपात्र व्यक्ती पात्र व्यक्तीच्या यादीत येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी संबंधित अपात्र व्यक्तीचा पुरावा जोडावा, असे आवाहन प्रशासनाच्या मार्फत करण्यात आले आहे. १२ आॅक्टोबरपासून तालुकास्तरावर याद्या बनविण्याचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे ११ आॅक्टोबरपर्यंत नागरिकांनी संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांकडे याबाबतचे आक्षेप नोंदविता येणार आहे.