शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

यावर्षीच्या पोलीस पदभरतीत ओबीसींना सर्वाधिक जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2022 23:51 IST

गडचिराेली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील पोलिस भरती सर्वात मोठी भरती म्हणून ओळखली जाते. या भरतीच्या अनुषंगाने सूचनादेखील देण्यात आलेल्या आहेत. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिस शिपाई संवर्गातील पदांची भरती करणे अत्यावश्यक असल्याने या संवर्गातील १०० टक्के रिक्त पदे तातडीने भरण्यात येणार आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : महाराष्ट्र पाेलिस शिपाई  नियम २०११ व त्यानंतर शासनाने वेळाेवेळी आणि २३  जून २०२२ च्या आदेशान्वये केलेल्या सुधारणेनुसार गडचिराेली पाेलिस अधीक्षक कार्यालयाच्या आस्थापनेवर सन २०२२ मध्ये पाेलिस शिपाई पदाच्या ३४८ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या भरतीत इतर मागासवर्गीयांच्या सर्वाधिक १९० जागा आहेत. त्याखालाेखाल अनुसूचित जमातीच्या ११० जागा आहेत. ऑनलाइन आवेदन अर्ज सादर करण्यास सुरुवात झाली असून उमेदवारांकडून लगबग वाढली आहे.गडचिराेली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील पोलिस भरती सर्वात मोठी भरती म्हणून ओळखली जाते. या भरतीच्या अनुषंगाने सूचनादेखील देण्यात आलेल्या आहेत. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिस शिपाई संवर्गातील पदांची भरती करणे अत्यावश्यक असल्याने या संवर्गातील १०० टक्के रिक्त पदे तातडीने भरण्यात येणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याच्या बैठकीनंतर राज्यात पोलिसांची २० हजार पदे भरण्यात येणार असल्याचे जाहीर केले हाेते. भरती प्रक्रियेच्या जाहिराती निघाल्या असून या प्रक्रियेला वेग आला आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी. उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करू शकत नाही. उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास, उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल, असे जिल्हा पाेलीस विभागाने स्पष्ट केले आहे. पाेलिस भरती प्रक्रिया पाेलिस अधीक्षक नीलाेत्पल यांच्या नेतृत्वात हाेणार आहे. पाेलिस शिपायांची ३४८ तर चालकांच्या १६० जागा भरल्या जाणार आहेत. हा अर्ज पाेलिस विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे.

तहसीलदारांकडील वास्तव्याचा दाखला आवश्यक

महाराष्ट्र शासन, गृह विभाग, आदेश दि. २३ मार्च, २०१८ अन्वये पाेलिस भरतीतील उमेदवाराला अतिरिक्त १०० गुणांची गोंडी माडीया भाषेची लेखी चाचणी परीक्षा द्यावी लागणार आहे. या लेखी परीक्षेमध्ये ३५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होणे आवश्यक असून हे गुण अंतिम गुणवत्ता यादी तयार करताना विचारात घेतले जाणार नाही. महाराष्ट्र शासन, गृह विभाग, आदेश दि. २३ मार्च, २०१८ अन्वये गडचिरोली जिल्ह्यात राहणाऱ्या उमेदवारांनाच गडचिरोली जिल्हा पोलिस भरतीमध्ये भाग घेता येईल. या उमेदवारांना प्रचलित नियमानुसार संबंधित तहसीलदारांनी दिलेला वास्तव्याचा दाखला जोडणे आवश्यक राहील, असे पाेलिस विभागाने नमूद केले आहे.

शारीरिक चाचणी सरावाला वेगपाेलिस शिपाई पद भरतीसाठी लेखी परीक्षेसाेबतच शारीरिक चाचणीत चांगले गुण असणे आवश्यक आहे. दाेन्ही परीक्षेतील मूल्यांकन व प्राप्त गुणांनुसार पात्र उमेदवारांची यादी जाहीर हाेत असते. युवक, युवती  व बहुतांश उमेदवार या दाेन्ही परीक्षांची तयारी करीत आहेत. सध्या हिवाळा असून पहाटेच्या सुमारास प्रमुख मार्ग व जिल्हा स्टेडियमवर शारीरिक चाचणीचा सराव करीत आहेत. पहाटेपासून सकाळपर्यंत स्टेडियमवर पाेलिस भरतीत उतरणाऱ्या उमेदवारांची गर्दी दिसून येत आहे.

 

टॅग्स :Policeपोलिस