शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींचे आंदोलन पुन्हा पेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:54 IST

जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यांवरून ६ टक्क्यावर आणण्यात आले. त्यामुळे ओबीसी समाजातील युवकांचे शासकीय नोकरीचे दारे बंद झाली आहेत. ओबीसी आरक्षणाच्या या मुद्यावर लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी ओबीसी संघर्ष कृती समितीच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले होते.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांकडे मागणी : आरक्षण पूर्ववत १९ टक्के करून नोकरभरतीची प्रक्रिया राबवा

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यांवरून ६ टक्क्यावर आणण्यात आले. त्यामुळे ओबीसी समाजातील युवकांचे शासकीय नोकरीचे दारे बंद झाली आहेत. ओबीसी आरक्षणाच्या या मुद्यावर लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी ओबीसी संघर्ष कृती समितीच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले होते. त्यानंतर आंदोलनाची धार कमी झाली. आता पुन्हा निवडणुका पुन्हा तोंडावर असल्याने ओबीसी संघटनांनी आरक्षणाच्या मुद्यावर आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे आता ओबीसींचे आंदोलन जिल्हाभरात पेटणार आहे.कोरची तालुक्यातील ओबीसी संघटनेच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना मंगळवारी निवेदन पाठविण्यात आले. निवेदन देताना नंदकिशोर वैरागडे, अशोक गावतुरे, राष्टÑपाल नखाते, राहुल मांडवे, विठ्ठल शेंडे, प्रा.पी.के.चापले, गोपाल मोहुर्ले, मुरलीधर शेंडे, मधुकर शेंडे, शिखा शेंडे, नितीन शेंडे, संतोष मोहुर्ले, दामेंद्र येवले, खुशाल जेंगठे, प्रदीप गावतुरे आदींसह बहुसंख्य ओबीसी बांधव उपस्थित होते.निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्ह्यात ओबीसी समाजाची संख्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. केंद्रात ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षणाची शिफारस असतानाही गडचिरोली जिल्ह्यात सुरुवातीला ओबीसींना १९ टक्के आरक्षण देण्यात आले. त्यानंतर राजकीय डावपेचाने हे आरक्षण कमी करीत आता, सहा टक्क्यावर ठेवण्यात आले. ओबीसी प्रवर्गात सुमारे ५०० जाती व पोटजातींचा समावेश असून त्यांच्यासाठी केवळ सहा टक्के आरक्षण हे अतिशय नगण्य आहे. आरक्षण कमी केल्याने ओबीसी बांधवांवर अन्याय होत आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्याचा शब्द दिला होता. मात्र सत्ताधाºयांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सकारात्मक आश्वासन दिले होते. त्यांनी आता ओबीसी आरक्षणावर निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीOBCअन्य मागासवर्गीय जाती