शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

छत उडालेल्या गोदामात ठेवला पोषण आहार

By admin | Updated: June 8, 2015 02:08 IST

अंगणवाडीतील बालकांना पुरविण्यात येणारा पोषण आहार पंचायत समितीच्या छत उडालेल्या गोदामात ठेवण्यात आला आहे.

खराब होण्याची शक्यता : अधिकारी व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षप्रतीक मुधोळकर  अहेरीअंगणवाडीतील बालकांना पुरविण्यात येणारा पोषण आहार पंचायत समितीच्या छत उडालेल्या गोदामात ठेवण्यात आला आहे. परिणामी पावसाचे पाणी या पोषण आहारावर पडून सदर पोषण आहार खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे.लहान बालकांना अंगणवाडीमध्ये येण्याविषयी आवड निर्माण व्हावी, त्याचबरोबर त्यांना पोषण आहार प्राप्त व्हावे यासाठी राज्य शासनाकडून सकस आहारांतर्गत खाद्य पदार्थ पुरविले जातात. सदर खाद्य पदार्थ सर्वप्रथम पंचायत समितीस्तरावर एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाला उपलब्ध होतात. त्यानंतर त्याचे वितरण प्रत्येक अंगणवाडी स्तरावर करण्यात येते. अहेरी पंचायत समितीला २९ मे रोजी शेकडो बॉक्स चिक्की (खाद्य पदार्थ) उपलब्ध झाली. सदर चिक्की अंगणवाडीस्तरावर वितरणाचे काम सुरू आहे. तोपर्यंत सदर चिक्की एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाच्या गोदामामध्ये ठेवण्यात आली आहे. सदर गोदाम कौलारू असून काही खोल्यांमधील कवेलु फुटले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी गोदामाच्या खोलीमध्येच पडते. याच खोल्यांमध्ये चिक्की ठेवण्यात आली आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून अधुनमधुन पाऊस पडत आहे. पावसाचे फवारे चिक्कीच्या बॉक्सवर पडत आहेत. पावसाळ्याला सुरूवात झाली आहे. कधीही मोठा पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोठा पाऊस झाल्यास हे संपूर्ण चिक्कीचे डब्बे पावसाच्या पाण्याने ओलेचिंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चिक्की ही साखर व शेंगदाण्यापासून बनली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी या बॉक्समध्ये गेल्यास संपूर्ण चिक्की खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर या बॉक्सला मुंग्या लागून ते खराब होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. एवढेच नाही तर ज्या ठिकाणी हे संपूर्ण बॉक्स ठेवण्यात आले आहेत, त्याच्या सभोवताल मोठ्या प्रमाणात कागदपत्रांचा कचरा पसरला आहे. यातील किटक चिक्कीला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.गोदाममध्ये ठेवण्यात आलेली चिक्की २९ मे रोजी प्राप्त झाली आहे. १९७ बॉक्सपैकी ८० बॉक्सचे वितरणही अंगणवाड्यांना झाले आहे. सद्य:स्थितीत चिक्कीचे बॉक्स चांगले आहेत. मात्र जोरदार पाऊस झाल्यास सदर चिक्की खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लहान मुले व गरोदर माताना देण्यात चांगला आहार मिळावा यासाठी आम्ही नेहमीच दक्ष राहतो. इमारत दुरूस्तीसाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र अजुनपर्यंत सदर इमारतीच्या दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध झाला नाही. - आर. डी. मेश्राम, बाल विकास प्रकल्प अधिकारी अहेरीकुलूप नसलेले गोदामज्या गोदामामध्ये चिक्की ठेवण्यात आली आहे, त्या गोदामाला कुलूप नाही. या गोदामाचा मुख्य दरवाजा तुटला आहे. त्यामुळे कोणताही नागरिक या गोदामामध्ये सहज प्रवेश करून सदर बॉक्स चोरीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर छतावरूनही या गोदामामध्ये सहज प्रवेश करता येते. गोदाम दुरूस्तीकडे दुर्लक्षजिल्हा परिषदेकडे इमारत बांधकामासाठी दरवर्षी कोट्यवधी रूपयांचा निधी येतो. या निधीतून सदर गोदामाची दुरूस्ती किंवा नवीन गोदामाचे बांधकाम सहज शक्य आहे. मात्र येथील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, सदस्य व अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने गोदाम दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध झाला नाही.