शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

लोहखाणीत वाढताहे काम मागणाऱ्यांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2021 05:00 IST

सुरक्षा गार्ड, पहाडीवरील काम, कंपनीकडून सुरू असलेले एटापल्ली-आलापल्ली रस्त्याचे काम, जीवनगट्टा येथील बेस कॅम्पचे काम, हेडरी व एटापल्ली येथील दवाखाना, एटापल्ली येथील ऑक्सिजन प्लांट यासह इतर ठिकाणी महिला, पुरुष, सुशिक्षित बेरोजगार युवकांना काम मिळाले आहे. सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देणाऱ्या प्रकल्पाला ग्रामसभेचा विरोध असला तरी प्रकल्पात काम मिळण्यासाठी सामान्य नागरिक आणि बेरोजगार युवा वर्गाची धडपड सुरू आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून काम मिळेल आणि आपल्याही घरात चार पैसे येतील, या आशा लावून ते बसले आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तालुक्यातील सुरजागड पहाडीवरील लोहखनिज प्रकल्पाचे काम नव्या जोमाने सुरू झाले आहे. दररोज दोन हजारांवर मजूर या कामावर हजेरी लावत आहेत. त्यांना पाहून परिसरातील अनेक गावांतील लोकही काम मागण्यासाठी सरसावत आहेत. यात सुशिक्षित बेरोजगारांसह अल्पशिक्षित किंवा अशिक्षितांचेही प्रमाण मोठे आहे.दररोज  शेकडो बेरोजगार युवक सुरजागड पहाडीवर जाऊन अर्ज करत कामाची मागणी करीत आहेत. सद्य:स्थितीत कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, दोन हजारांवर लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.यात सुरक्षा गार्ड, पहाडीवरील काम, कंपनीकडून सुरू असलेले एटापल्ली-आलापल्ली रस्त्याचे काम, जीवनगट्टा येथील बेस कॅम्पचे काम, हेडरी व एटापल्ली येथील दवाखाना, एटापल्ली येथील ऑक्सिजन प्लांट यासह इतर ठिकाणी महिला, पुरुष, सुशिक्षित बेरोजगार युवकांना काम मिळाले आहे. सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देणाऱ्या प्रकल्पाला ग्रामसभेचा विरोध असला तरी प्रकल्पात काम मिळण्यासाठी सामान्य नागरिक आणि बेरोजगार युवा वर्गाची धडपड सुरू आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून काम मिळेल आणि आपल्याही घरात चार पैसे येतील, या आशा लावून ते बसले आहेत. विशेष म्हणजे ज्या खराब रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांनी आंदोलन केले होते त्या रस्त्याचे काम अखेरपर्यंत कंत्राटदाराने सुरूच केले नाही. त्यामुळे हे काम आता सुरजागड पहाडीवर काम करणाऱ्या त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपनीने हाती घेतले आहे. आलापल्ली ते चोखेवाडापर्यंतच्या रस्त्याला मंजुरी मिळाली आहे. 

आरोग्यविषयक सोयी-सुविधांची भरलॉयड्स मेटल्सने लोहखनिज काढण्याचे काम ज्या कंपनीला दिले त्या त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपनीने एटापल्ली आणि हेडरी येथे रुग्णालय सुरू केले आहे. त्या ठिकाणी मोफत औषधोपचार दिले जात आहे. त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. याशिवाय एटापल्ली ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात या कंपनीने ऑक्सिजन प्लांट तयार केला आहे. आपत्कालीन स्थितीत गरज पडेल त्याला किंवा कोरोनासारख्या महामारीची लाट आल्यास या आरोग्य सुविधेतून मोठा दिलासा मिळणार आहे.

भविष्य निर्वाह निधीचा विचार करादरम्यान सुरजागड पहाडावरील कामगारांना दिवसानुसार आणि हप्त्यानुसार कामाचा मोबदला न देता महिन्याकाठी पगार द्यावा, तसेच त्यांच्या भविष्य निर्वाह निधीचाही विचार करावा, जेणेकरून कामावरील युवकांची बचत होऊन कुटुंबीयांसाठी भविष्यातील नियोजन करणे सोपे जाईल, अशी मागणी आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी केली आहे. आज २ हजार युवक काम करत आहेत; पण ही संख्या वाढण्यासाठी कोनसरीचा प्रकल्प लवकर सुरू करून युवा वर्गाची रोजगाराची समस्या कंपनीने दूर करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :Unemploymentबेरोजगारी