शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात गायी घटल्या, बकऱ्या वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 05:00 IST

शेतीतील यांत्रिकीकरणामुळे बैलांचेही महत्त्व कमी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गायी कसायाला विकण्यास सुरुवात केली आहे. २०१२ मध्ये १९ वी पशुगणना करण्यात आली. त्यावेळी गडचिराेली जिल्ह्यात गायवर्गीय जनावरांची संख्या ५ लाख १ हजार ३२३ एवढी हाेती. २०१९ राेजी २० वी पशुगणना करण्यात आली. त्यात गावठी गाय व बैलांची संख्या सुमारे ५१ हजार ८९२ एवढी घटली आहे. केवळ ४ लाख ४९ हजार ४३१ जनावरे शिल्लक आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : २०व्या पशुगणनेचा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. यामध्ये गावठी गायींची संख्या सुमारे २० टक्क्यांनी घटली आहे; तर बकऱ्यांची संख्या ३० टक्क्यांनी वाढली आहे. शेतीतील यांत्रिकीकरणामुळे बैलांचेही महत्त्व कमी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गायी कसायाला विकण्यास सुरुवात केली आहे. २०१२ मध्ये १९ वी पशुगणना करण्यात आली. त्यावेळी गडचिराेली जिल्ह्यात गायवर्गीय जनावरांची संख्या ५ लाख १ हजार ३२३ एवढी हाेती. २०१९ राेजी २० वी पशुगणना करण्यात आली. त्यात गावठी गाय व बैलांची संख्या सुमारे ५१ हजार ८९२ एवढी घटली आहे. केवळ ४ लाख ४९ हजार ४३१ जनावरे शिल्लक आहेत. या गायी अधिक प्रमाणात दूध देतात. २०१२ मध्ये बकऱ्यांची संख्या २ लाख ५७० एवढी हाेती. २०१९ मध्ये ती २ लाख ३९ हजार ५८७ एवढी झाली आहे.

म्हशींची संख्याही झाली कमी

१९ व्या पशुगणनेदरम्यान जिल्ह्यात म्हशींची संख्या ७६ हजार ३७२ हाेती. ती कमी हाेऊन ६६ हजार २५९ एवढी झाली आहे. प्रामुख्याने दूध व्यवसायासाठी म्हशी पाळल्या जात हाेत्या. दूध उत्पादक आता हाॅलेस्टाईन फ्रिजन या प्रकारातील गायी वापरतात.

संकरित गायींचे प्रमाण वाढले-    गावठी गायींची उत्पादन क्षमता अतिशय कमी आहे. त्यामुळे अनेक पशुपालकांनी गावठी गायी पाळणे बंद केले आहे. त्याऐवजी ते हाॅलेस्टाईन फ्रिजन, जर्सी, आदी प्रकारच्या गायी पाळत आहेत. -    या गायी गावठी गायींच्या तुलनेत कित्येक पटींनी अधिक दूध देतात. काही बेराेजगार युवक संकरित गायींच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय करतात.

मेंढ्या व काेंबड्या वाढल्याकाही पशुपालक मेंढ्या पाळतात. विशेष म्हणजे, १९ व्या जनगणनेच्या तुलनेत २० व्या जनगणनेत मेंढ्यांची संख्या वाढली असल्याचे दिसून येते. १९ व्या पशू जनगणनेत जिल्ह्यात ७ हजार २२४ मेंढ्या हाेत्या. त्यांची संख्या २० व्या पशु गणनेदरम्यान १८ हजार ६०५ एवढी झाली आहे. काेंबड्यांची संख्या ४ लाखांनी वाढली आहे. 

संकरित गायीचे दुध किती पाेषक?

-    संकरित गायीचे दूध गावठी गायीच्या तुलनेत पातळ राहते. त्यामुळे त्यात गावठी गायीच्या तुलनेत कमी प्रमाणात जीवनसत्व राहतात.

-   संकरित गायीचे दही, तूप गावठी गायीएवढे चविष्ट राहत नाही. दही, तूप पिवळे दिसत असल्याने गडचिराेलीतील नागरिक खरेदी करण्यास धजावत नाही.

-    संकरीत गायींच्या पालन पाेषणाचा खर्च गावठी गायीच्या तुलनेत अधिक प्रमाणात आहे.

 

टॅग्स :cowगाय