शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
4
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
5
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
6
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
7
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
8
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
9
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
10
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
11
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
12
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
13
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
14
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
15
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
16
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
17
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
18
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
19
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
20
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...

एनएसयूआयची गोंडवाना विद्यापीठावर धडक

By admin | Updated: September 20, 2016 00:53 IST

विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन एनएसयूआच्या शेकडो कार्यकर्त्यांनी गोंडवाना विद्यापीठावर धडक दिली.

कुलगुरूंसोबत चर्चा : शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश; समस्या सोडविण्याची मागणीगडचिरोली : विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन एनएसयूआच्या शेकडो कार्यकर्त्यांनी गोंडवाना विद्यापीठावर धडक दिली. कुलगुरूंना निवेदन देऊन या मागण्यांसंदर्भात चर्चा केली. नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क विषय संख्येनुसार आकारण्यात यावे, विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी बूक बँक चालू करावी, कुलगुरूंनी दर महिन्याला प्रत्येक विभागानुसार विद्यार्थी परिषद घ्यावी, उत्तर पत्रिकेची फोटोकॉपी द्यावी, परीक्षा व मूल्यांकन याकरिता आकारण्यात येणारे शुल्क कमी करावे. मूल्यांकणाचे काम ४५ दिवसांत पूर्ण करावे, पुनर्मूल्यांकन आणि बॅकलॉग पेपरमध्ये ठराविक दिवसांचा अवधी असावा, पुनर्मूल्यांकनाचा निकाल १५ दिवसांत लावावा. विद्यापीठातील वाढत्या भ्रष्टाचाराला आळा घालावा, पुनर्मूल्यांकणामध्ये कोणत्याही विषयात १० टक्के गुण वाढल्यास मूळ उत्तरपत्रिका तपासणाऱ्या प्राध्यापकांवर दंडात्मक कारवाई करावी, पूर्णवेळ प्राध्यापक, प्राचार्य आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांची नियुक्ती तत्काळ करावी, शिष्यवृत्तीधारकांना शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीला जेवढी रक्कम निर्धारित करण्यात आली आहे तेवढी रक्कम देण्यात यावी आदी मागण्यांसाठी एनएसयूआयच्या शेकडो कार्यकर्त्यांनी गोंडवाना विद्यापीठावर धडक दिली. आंदोलनाचे नेतृत्त्व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. डॉ. नामदेवराव उसेंडी, हसनअली गिलानी, पंकज गुड्डेवार, लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, शहर काँग्रेस अध्यक्ष सतीश विधाते, एनएसयूआयचे अध्यक्ष नीतेश राठोड यांनी केले. शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. कल्याणकर यांची भेट घेऊन मागण्यांसंदर्भात चर्चा केली. चर्चेदरम्यान या मागण्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन कुलगुरूंनी दिले. यावेळी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, मीडिया सेलचे अध्यक्ष नंदू वाईलकर, अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षा लता ढोक, अपर्णा खेवले, आशा मेश्राम, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, राकेश गणवीर, लॉरेन्स गेडाम, एटापल्ली एनएसयूआय तालुकाध्यक्ष आकाश मुजूमदार, चामोर्शी अध्यक्ष राकेश मुनगेनवार, युवक काँग्रेस महासचिव कुणाल पेंदोरकर, पं. स. सदस्या अमिता मडावी, प्रवीण इंदूरी, गोल्डी इंगोले, नीतेश बाळेकरमकर, वैैभव भागडकर, कमल मंडल, राज सोनुने, मोहन कामेवार, अंकित वरगंटीवार, अरूण तेलकुंटलवार, नितीन पल्लेलवार, राकेश लोहंबळे, पुनेश मडावी, सचिन कोटरंगे, मनीष दुर्गे, शुभम दुर्वा, अक्षय सडमेक, संतोष वाढई, अविनाश रामटेके, गौरव आलाम, नीतेश अंबादे, सौरभ फाये, अतुल गेडाम, रोशन सोरते, नेहा देशमुख, नीकिता नरड, प्रीती बोरकुटे, रेणुका खडसे सहभागी झाले होते. (नगर प्रतिनिधी)