लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : नगर पंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने १७ ऑगस्ट रोजी सोमवारला शासनाच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली.महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने सोमवारी राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले. या आंदोलनात सहभागी होत कुरखेडा नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय कामबंद आंदोलन पुकारले. यावेळी अज्ञान पेंदाम, हिराकांत कोसरे, रोशन मेश्राम, देविदास देशमुख, नामदेव राऊत, महादेव दोनाडकर, संजय दोनाडकर, राजेश कटकवार आदीसह इतर कर्मचारी सहभागी झाले होते.नगर पंचायत कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन तत्काळ अदा करण्यात यावे, नव्याने निर्मित नगर परिषद/नगर पंचायतमधील उद्घोषणेपूर्वीचे व उद्घोषणानंतरचे सर्व कर्मचाऱ्यांचे समावेशन करण्यात यावे, रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, सफाई कर्मचाऱ्यांना मुकादम पदावर पदोन्नती देण्यात यावी, लिपीक संवर्गाला पदोन्नती देत वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करावी, कर्मचाऱ्यांच्या पेंशनचा प्रश्न निकाली काढावा, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या तसेच इतर सेवाविषयक प्रश्न तातडीने मार्गी लावाव्या आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी कुरखेडा नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय कामबंद आंदोलन पुकारले.सन २०१५ मध्ये कुरखेडा नगर पंचायतीची निर्मिती झाली. गेल्या पाच वर्षापासून येथील कर्मचाºयांचे सेवाविषयक प्रश्न कायम आहेत.रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर ताणकुरखेडासह जिल्ह्यातील इतर आठ नगर पंचायत कार्यालयात कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. वाढत्या लोकसंख्येनुसार नगर पंचायतीचा आवाका वाढल असून नवी पदभरती झाली नाही. परिणामी कामाचा ताण पडत आहे.
न.पं. कर्मचाऱ्यांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 05:00 IST
नगर पंचायत कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन तत्काळ अदा करण्यात यावे, नव्याने निर्मित नगर परिषद/नगर पंचायतमधील उद्घोषणेपूर्वीचे व उद्घोषणानंतरचे सर्व कर्मचाऱ्यांचे समावेशन करण्यात यावे, रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, सफाई कर्मचाऱ्यांना मुकादम पदावर पदोन्नती देण्यात यावी,
न.पं. कर्मचाऱ्यांची निदर्शने
ठळक मुद्देकुरखेडात आंदोलन : प्रलंबित वेतन, पदोन्नतीसह विविध मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष