शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

न.प. मुख्याधिकाऱ्यांच्या निष्क्रिय कारभारामुळे शहर विकासाला खीळ

By admin | Updated: February 8, 2016 01:32 IST

नगर पालिकेचे पदाधिकारी व मुख्याधिकारी यांचेवर गडचिरोली शहराच्या विकासाची जबाबदारी आहे.

राजेश कात्रटवार यांचा आरोप : निधी अखर्चित राहण्याची शक्यतागडचिरोली : नगर पालिकेचे पदाधिकारी व मुख्याधिकारी यांचेवर गडचिरोली शहराच्या विकासाची जबाबदारी आहे. मात्र नगर पालिकेचे मुख्याधिकारी पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नसल्याने विकासाला खिळ बसली आहे. नगर पालिकेला विविध योजनेंतर्गत कोट्यवधी रूपयांचा निधी प्राप्त झाला. सदर निधी कोणत्या कामावर खर्च करावा, याचे नियोजन करून तसा ठराव दोन महिन्यांपूर्वी घेण्यात आला. मात्र मुख्याधिकाऱ्यांच्या अकार्यक्षम कारभारामुळे विकास कामे रखडली. त्यामुळे पालिकेचा निधी मोठ्या प्रमाणात अखर्चीत राहण्याची शक्यता आहे. न.प. मुख्याधिकाऱ्यांना प्रशासकीय पाठबळ मिळत आहे, असा आरोप नगर पालिकेचे बांधकाम सभापती प्रा. राजेश कात्रटवार यांनी केला आहे. सभापती कात्रटवार यांनी म्हटले आहे की, नगरोत्थान योजनेंतर्गत चार तर दलित वस्ती सुधार योजनेतून दोन कोटींचा निधी पालिकेला प्राप्त झाला आहे. या निधीतून शहरातील अनेक वार्डातील विकासकामे पूर्ण होणार आहेत. परंतु निष्क्रीय मुख्याधिकाऱ्यांच्या अकार्यक्षम कारभारामुळे सदर निधी तसाच पडून आहे. आर्थिक वर्ष पूर्ण होण्यासाठी केवळ दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. या कालावधीत निधी खर्च न झाल्यास शहर विकासावर परिणाम होऊ शकतो. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात पाणी पुरवठ्याची समस्या निर्माण झाली आहे. बारमाही वाहणारी वैनगंगा नदी असूनही दिवसातून एकदाच पाणी पुरवठा करावा लागत आहे. ही समस्या असूनही मुख्याधिकारी पालिका व शहराला वाऱ्यावर सोडून दीर्घ रजेवर गेले आहे, असेही कात्रटवार यांनी म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)पदाधिकाऱ्यांकडून कामांचे ठराव उशिरा घेण्यात आले. यापैकी काही ठरावावर अंदाजपत्रक तयार करून काही कामांना तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. तर काही कामांचे ठराव तांत्रिक मंजुरीसाठी वरिष्ठांकडे पाठविण्यात आले आहेत. पालिकेत कर्मचारी कमी आहेत. कामातील त्रूट्या दूर करून शहरातील कामे लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल.- गिरीश बन्नोरे, सीओ न.प.गडचिरोलीमुख्यमंत्र्यासमोरही वाचला निष्क्रियतेचा पाढानगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचे स्थानांतरण करण्यात यावे, अशी मागणी खा. अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी, आ. मितेश भांगडिया यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. त्यानंतर आ. कीर्तीकुमार भांगडिया यांच्या नेतृत्वात नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन सीओंच्या निष्क्रियतेचा पाढा वाचला.अविश्वास ठरावानंतरही कारवाई नाहीन.प. मुख्याधिकाऱ्यांविरूध्द सन २०१५ मध्ये अविश्वास ठराव पारित करण्यात आला. या ठरावाला २३ नगर सेवकांचा पाठींबा आहे. मात्र मुख्याधिकाऱ्यांवर अद्यापही प्रशासकीय कारवाई करण्यात आली नाही.