शहरं
Join us  
Trending Stories
1
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
2
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
3
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
4
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
5
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
6
Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!
7
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
8
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
9
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
10
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
11
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
12
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
13
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
14
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
15
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
16
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
17
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
18
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
19
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
20
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार

आता वीकेंड घरातच, जिल्ह्यात हाॅटेलिंग व्यवसाय राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 05:00 IST

गडचिराेली शहरात धानाेरा, आरमाेरी मार्ग, काॅम्प्लेक्स परिसर तसेच इंदिरा गांधी चाैक व इतर सर्व ठिकाणची मिळून जवळपास २७ छाेटी-माेठी हाॅटेल आहेत. या हाॅटेलमध्ये भाेजनाची व्यवस्था आहे. काेराेनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेदरम्यानही शासनाच्या निर्बंधानुसार हाॅटेल व्यवसाय अनेक महिने बंद राहिले. काही महिने केवळ पार्सल सेवा सुरू केली हाेती. आता शासनाच्या नव्या नियमानुसार गडचिराेली शहर व जिल्ह्यातील सर्व हाॅटेल सायंकाळी चार वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. 

ठळक मुद्देडेल्टाच्या पार्श्वभूमीवर निर्णय; भाेजनालय व्यवसाय पूर्वपदावर येईना

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : एक जूनला शिथिल करण्यात आलेले निर्बंध कसेबसे २५ दिवस सुरू राहिले. आता काेराेनाच्या तिसऱ्या लाटेचा धाेका लक्षात घेऊन डेल्टामुळे राज्यात पुन्हा निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे वीकेंड हाॅटेलिंग पुन्हा बंद झाले आहे. तिसऱ्या लाटेचा धाेका निर्माण झाल्याने बाजारपेठेतील गर्दी राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आज, साेमवारपासून सायंकाळी चार वाजेनंतर जवळपास सर्वच व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात सद्य:स्थितीत काेराेनाची रुग्णसंख्या झपाट्याने कमी हाेत आहे. असे असतानाही बाजारपेठेतील गर्दी लक्षात घेता, काेराेनाची तिसरी लाट केव्हाही येऊ शकते. त्यामुळे आतापासून निर्बंध कडक करण्यात आले आहे. गडचिराेली शहरात धानाेरा, आरमाेरी मार्ग, काॅम्प्लेक्स परिसर तसेच इंदिरा गांधी चाैक व इतर सर्व ठिकाणची मिळून जवळपास २७ छाेटी-माेठी हाॅटेल आहेत. या हाॅटेलमध्ये भाेजनाची व्यवस्था आहे. काेराेनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेदरम्यानही शासनाच्या निर्बंधानुसार हाॅटेल व्यवसाय अनेक महिने बंद राहिले. काही महिने केवळ पार्सल सेवा सुरू केली हाेती. आता शासनाच्या नव्या नियमानुसार गडचिराेली शहर व जिल्ह्यातील सर्व हाॅटेल सायंकाळी चार वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. 

खरी उलाढाल हाेते सायंकाळलाच गडचिराेली जिल्ह्यात पाेलीस विभागात अनेक अधिकारी व  कर्मचारी कार्यरत आहेत. शिवाय सीआरपीएफ, एसआरपीएफ जवानही आहेत. तसेच विविध विभागातील जिल्ह्याच्या बाहेरील कर्मचारी आपल्या कुटुंबाला साेडून एकटेच ड्युटीच्या निमित्ताने गडचिराेलीत राहत आहेत. ते सुटीच्या दिवशी भाेजनालयात जाऊन खास भाेजनाचा आस्वाद घेण्यावर भर देत असतात. सायंकाळी व रात्रीच भाेजनासाठी हाॅटेलात गर्दी हाेत असते.

हाॅटेल व्यवसाय कधी उभा राहणार?

गेल्या दीड वर्षापासून हाॅटेल व्यवसाय डबघाईला आला आहे. काेराेना संकटामुळे या व्यवसायावर फार माेठा परिणाम झाला आहे. मध्यंतरी सुरू झालेला व्यवसाय काेराेनाच्या तिसऱ्या लाटेमुळे पुन्हा बंद हाेण्याच्या मार्गावर आहे. परिणामी आम्हा हाॅटेल व्यावसायिकांचे नुकसान हाेत आहे. हाॅटेलसाठी सायंकाळचा वेळ द्यावा.- चंद्रकांत पतरंगे, हाॅटेल व्यावसायिक 

काेराेनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दुपारी ४ वाजतानंतर हाॅटेल बंद ठेवावे लागणार आहे; पण यातून वीज बिल, भाडे, परवाना शुल्क भरून निघणे कठीण आहे. हाॅटेल व्यवसायावर अनेकांचा राेजगार अवलंबून आहे. हाॅटेल बंद पडल्यास  त्यांचा राेजगार हिरावला जाईल. सरकारने मदत द्यावी.- राेशन कवाडकर, हाॅटेल व्यावसायिक

- साेमवारपासून ते शुक्रवारपर्यंत सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत ५० टक्के डायनिंग क्षमतेसह रेस्टारंट, उपहार गृह व हाॅटेल सुरू ठेवण्याची मुभा असेल. त्यानंतर इतर वेळेस पार्सल/हाेम डिलिव्हरी सुरू ठेवता येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी काढलेल्या नव्या आदेशात नमूद आहे.- काेविडबाबत गडचिराेली जिल्ह्यात स्टेज ३ नुसार जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी नवीन आदेश जारी केले. प्रतिबंधात्मक उपाययाेजनेंतर्गत २८ जूनपासून निर्बंध लागू केले आहे.

हाॅटेल कर्मचाऱ्यांचे तर आणखी हाल

काेराेना संकाटामुळे पाच ते सहा महिने हाॅटेल बंद राहिल्याने आमचा राेजगार गेला. औषधाेपचार व बराच खर्च महिन्याला करावा लागताे. लाॅकडाऊनमुळे हाॅटेल बंद राहत असल्याने आर्थिक अडचण निर्माण झाली.  राहण्याचे खाेलीभाडे थकीत राहिले. तिन ते चार महिने गावाकडे राहून दिवस  काढावे लागले.- विनाेद रायपुरे, कामगार 

हाॅटेल व्यवसाय हा अत्यंत महत्वाचा आणि दरराेज गाेरगरीबांच्या गरजेचा म्हणून ओळखला जाताे. या व्यवसायातून अनेकांना राेजगार मिळताे. परंतु गेल्या दीड वर्षापासून काेराेनाने कहर केला आहे. त्यामुळे हाॅटेल व्यवसायावर आर्थिक संक्रांत आली आहे. सरकारने किमान घरपाेच सेवा सुरू ठेवल्याने थाेडी मदत हाेईल. कामगारांना आर्थिक मदत देण्याची  मागणी आहे.- संदीप काेटांगले, कामगार

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhotelहॉटेल