शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

आता जिल्ह्यातच होणार सैन्यभरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 00:46 IST

भारतीय सैन्यदलातर्फे वेळोवेळी विविध जिल्ह्यात होणारी सैन्यभरतीची प्रक्रिया गडचिरोली जिल्ह्यात आजपर्यंत होत नव्हती. ही सैन्यभरती प्रक्रिया इतर जिल्ह्यात होत असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगार युवकांवर अर्थिक भुर्दंड बसत होता.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश : मुख्यमंत्र्यांनी दाखविली हिरवी झेंडी

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : भारतीय सैन्यदलातर्फे वेळोवेळी विविध जिल्ह्यात होणारी सैन्यभरतीची प्रक्रिया गडचिरोली जिल्ह्यात आजपर्यंत होत नव्हती. ही सैन्यभरती प्रक्रिया इतर जिल्ह्यात होत असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगार युवकांवर अर्थिक भुर्दंड बसत होता. तसेच प्रवासात बराच वेळ खर्च होत होता. मात्र आता पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने गडचिरोली जिल्ह्यात सैन्य पदभरतीची प्रक्रिया घेतली जाणार आहे.राज्य सरकार तर्फे भारतीय सैन्यदलाला राज्याच्या कोणत्या जिल्ह्यात सैन्यभरती घ्यायची याची शिफारस केली जाते. या बाबीची दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यापुढे होणारी सैन्यभरती ही गडचिरोली जिल्ह्यातच घेण्यात यावी अशी मागणी केली होती. याला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावर्षी पासून होणारी सैन्यभरती ही गडचिरोली जिल्ह्यातच घेण्यात येईल, असे मान्य केले आहे.आजपर्यंत पोलीस भरती याच जिल्ह्यात होत होती परंतु सैन्यभरती ही या जिल्ह्यात होत नसल्याने बेरोजगार युवकांची मोठी आर्थिक कोंडी होत होती याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने यापुढे होणारी सैन्यभरती ही गडचिरोली जिल्ह्यातच घेण्याचा सकारात्मक निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम व अतिदुर्गम भागातील बेरोजगारारांना सैन्य भरती प्रक्रियेत उतरणे सुलभ होणार आहे. सदर भरती प्रक्रिया गडचिरोली जिल्हास्तरावर होणार असल्याने याचा लाभ अहेरी उपविभागाच्या दुर्गम भागातील युवकांना मिळणार आहे.पोलीस व सैन्य भरतीवरच युवकांची मदारगडचिरोली जिल्हा हा उद्योग विरहीत जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात रोजगाराच्या संधी खुप कमी उपलब्ध आहेत. या जिल्ह्यात बेरोजगार युवकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून जिल्ह्यातील युवक पोलीस भरती व सैन्यभरती याकडे मोठ्या आशेने बघतात.

टॅग्स :SoldierसैनिकGadchiroliगडचिरोली