शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

आता गडचिरोलीतच आरटी-पीसीआर चाचण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 05:00 IST

या प्रयोगशाळेसाठी आवश्यक असलेली मशिनरी वेगवेगळया ठिकाणी आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनानुसार बसविण्यात आल्या आहेत. प्रत्येक प्रक्रि येसाठी सुसज्ज कक्ष व पुरेशा जागेची व्यवस्था करण्यात आली आहे. अवघ्या तीस दिवसात रात्रंदिवस सर्व कामे पुर्ण करून प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी झालेल्या कामांबाबत समाधान व्यक्त केले.

ठळक मुद्देप्रयोगशाळेची उभारणी पूर्ण : आठ दिवसात सुरु होणार प्रत्यक्ष स्वॅब तपासणीचे काम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील आरटी-पीसीआर ही कोरोनाची महत्वपूर्ण चाचणी करणारी प्रयोगशाळा नसल्यामुळे आतापर्यंत सर्व नमुने नागपूरला पाठवावे लागत होते. मात्र आता गडचिरोलीतच सदर चाचण्या होणार आहेत. त्यासाठी लागणाऱ्या प्रयोगशाळेची उभारणी अवघ्या ३० दिवसात करण्यात आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात येत्या आठवडाभरात ही प्रयोगशाळा कार्यान्वित होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.मंगळवारी जिल्हाधिकारी दीपक सिंगला व मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रत्यक्ष भेट देवून याबाबतच्या तयारीची पाहणी केली. विदर्भातील सर्वात प्रशस्त आरटी-पीसीआर प्रयोगशाळा अशी ख्याती या प्रयोगशाळेला मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.या प्रयोगशाळेसाठी आवश्यक असलेली मशिनरी वेगवेगळया ठिकाणी आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनानुसार बसविण्यात आल्या आहेत. प्रत्येक प्रक्रि येसाठी सुसज्ज कक्ष व पुरेशा जागेची व्यवस्था करण्यात आली आहे. अवघ्या तीस दिवसात रात्रंदिवस सर्व कामे पुर्ण करून प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी झालेल्या कामांबाबत समाधान व्यक्त केले. तसेच जिल्हा सामान्य रूग्णालय येथील प्रयोगशाळा उभारण्यासाठी पुढाकार घेणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. सर्व कामांची तांत्रिक तपासणी करून आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे. या प्रयोगशाळेच्या उभारणीनंतर व इतर आवश्यक व्यवस्थेबाबत खात्री पटल्यानंतर एम्सकडून कोरोना चाचणी तसेच इतर तपासण्या सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.मंगळवारी जिल्हाधिकाºयांच्या पाहणीदरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे यांनी प्रयोगशाळाबाबत माहिती दिली. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सतीशकुमार सोळंखे, डॉ.बागराज धुर्वे, महेश देशमुख, कार्यकारी अभियंता साखरवाडे उपस्थित होते.नागपूरवरून रिपोर्ट येण्याचा वेळ वाचणारही आरटी-पीसीआर प्रयोगशाळा अत्याधुनिक व प्रशस्त स्वरु पात आहे. आता जिल्ह्यातच कोरोना चाचणीचे निदान होणार असल्यामुळे नागपूरहून अहवाल येण्यास लागणारा दोन ते तीन दिवसांचा कालावधी वाचणार आहे. आरटी-पीसीआर चाचण्यांमुळे रु ग्णांवर केली जाणारी उपचार प्रक्रि याही सोपी होईल. बांधकाम विभागाने व जिल्हा सामान्य रु ग्णालयाने अतिशय वेगाने व चांगल्या गुणवत्तेचे काम करून या लॅबची उभारणी केली आहे.एकावेळी ११८ तपासण्यांची क्षमतागडचिरोली जिल्ह्यात विविध आजारांबाबतच्या तपासण्या या लॅबमध्ये होणार आहेत. ही प्रयोगशाळा आरोग्य विभागासाठी चांगली उपलब्धी आहे. कोरोना महामारीत या प्रयोगशाळेमुळे तपासण्यांना गती मिळणार आहे. एकावेळी ९४ अधिक २४ अशा ११८ तपासण्या करण्याची क्षमता या अत्याधुनिक प्रयोगशाळेत असणार आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या