शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

उच्च धान केंद्रांवर नव्हे, तर व्यापाऱ्यांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2022 05:00 IST

गेल्या दाेन वर्षांपासून काेराेनाचा संसर्ग कायम असल्याने शासनाने निधी वाटपात हात आखडता घेतला आहे. याचा परिणाम कृषी विभागाच्या याेजनांवरही झाला आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामातील धानाचे चुकारे शेतकऱ्यांना उन्हाळ्यात मिळाले हाेते. तर बाेनसची रक्कम मे व जून महिन्यात मिळाली हाेती. यावर्षी शासनाने ७०० रुपये बाेनस जाहीर केला नाही.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : गेल्या तीन वर्षांपासून राज्य शासनाकडून आधारभूत खरेदी याेजनेंतर्गत हमीभाव खरेदी केंद्रावरील धान विक्रीसाठी प्रती क्विंटल ७०० रुपये बाेनस शेतकऱ्यांना दिला जात हाेता. परंतु यावर्षी शेतकऱ्यांना ७०० रुपये बाेनस मिळेल, याची शाश्वती नसल्याने अनेक शेतकरी केवळ साधारण प्रतीचा जाड धान आधारभूत किमतीत विक्री करीत आहेत. मात्र उच्च प्रतीचा धान खासगी व्यापाऱ्यांकडे आधारभूत किमतीपेक्षा अधिक किमतीत विक्री केला जात आहे. गेल्या दाेन वर्षांपासून काेराेनाचा संसर्ग कायम असल्याने शासनाने निधी वाटपात हात आखडता घेतला आहे. याचा परिणाम कृषी विभागाच्या याेजनांवरही झाला आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामातील धानाचे चुकारे शेतकऱ्यांना उन्हाळ्यात मिळाले हाेते. तर बाेनसची रक्कम मे व जून महिन्यात मिळाली हाेती. यावर्षी शासनाने ७०० रुपये बाेनस जाहीर केला नाही. परंतु हमीभाव केंद्रांवर धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी अंतर्गत थेट पैसा जमा केला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात जाहीर केले हाेते. परंतु शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ७०० रुपयेच बाेनस मिळणार की, एकरी अथवा हेक्टरी रुपये बाेनसच्या रुपात जमा केले जातील. याबाबत शेतकऱ्यांमध्ये शंका आहे. त्यामुळे शेतकरी उच्च प्रतीच्या धानाची आधारभूत खरेदी केंद्रांवर विक्री न करता या धान खासगी व्यापाऱ्यांना २ हजार २०० ते २ हजार ४०० रुपये प्रती क्विंटल दराने विक्री करीत आहेत. तसेच मध्यम प्रतीचाही धान हमीभावापेक्षा २०० ते ३०० रुपये अधिक दराने विक्री हाेत आहे.

सातबारा जमा करणे बंदगेल्या दाेन वर्षात बाेनसच्या लाेभापाई अनेक खासगी व्यापारी तसेच काही शेतकरी इतरांकडून सातबारे जमा करून त्यांच्याकडील उच्चप्रतीचा धान आपण ठेवत असत व त्याबदल्यात शेतकऱ्यांच्या नावावर थेट आधारभूत केंद्रांवर साधारण जाड धानाची विक्री करीत असत. परंतु यावर्षी बाेनसबाबत शाश्वती नसल्याने शेतकऱ्यांकडून सातबारे जमा करणे बंद झाले आहे.

असे वापरायचे फंडेजिल्ह्यातील बहुतांश व्यापारी छत्तीसगड राज्यासह सीमावर्ती भागातून जाड धान आणून आधारभूत केंद्रांवर विक्री करायचे. तसेच शेतकऱ्यांकडून सातबारा घेऊन त्यांच्याकडील उच्च प्रतीचा धान स्वत: खुल्या बाजारपेठेत अधिक किमतीत विकायचे व संबंधित शेतकऱ्याच्या नावाने बाहेरून बाेलविलेला जाड धान विक्री केला जायचा. याशिवाय अनेक मध्यस्थी संस्थाही बाेनसच्या हव्यासाने बाहेरून धान आणून केंद्रांवर विक्री करण्याचे काम करीत हाेत्या.

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड