शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नवीन वसाहतीत ना पाणी, ना रस्ते !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 05:00 IST

नगर विकास विभागाच्या नियमानुसार प्लाॅट मालकाने सर्वप्रथम रस्ता, वीज, नाली या सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. एनएचे प्लाॅट असलेल्या ठिकाणी या सुविधा पुरविल्या जातात. मात्र एनएचे प्लाॅट महाग असल्याने काही नागरिक हे प्लाॅट खरेदी न करता शेतजमीन  खरेदी करून त्यावर घर बांधतात. शेतजमीनमालक त्या जागेवर रस्ता, वीज, नाली यासारख्या सुविधा उपलब्ध करत नाही. त्यामुळे घर बांधून काही वर्ष झाल्यानंतर नागरिक नगर परिषदेकडे रस्ता, नाली व पाण्याच्या पाईपलाईनसाठी तगादा लावतात. 

ठळक मुद्देगडचिराेलीतील स्थिती : मागील पाच वर्षात शहराच्या विस्ताराचा वेग वाढला

  लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : शहराचा विस्तार वाढत असताना नवीन वस्त्यांचीही संख्या वाढत आहे. मात्र या वस्त्यांमध्ये रस्ते, नाली व पाणी या मूलभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याचे दिसून येते. स्थानिक लोक त्यासाठी प्रभागाच्या नगरसेवकांना जबाबदार धरत आहेत.नगर विकास विभागाच्या नियमानुसार प्लाॅट मालकाने सर्वप्रथम रस्ता, वीज, नाली या सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. एनएचे प्लाॅट असलेल्या ठिकाणी या सुविधा पुरविल्या जातात. मात्र एनएचे प्लाॅट महाग असल्याने काही नागरिक हे प्लाॅट खरेदी न करता शेतजमीन  खरेदी करून त्यावर घर बांधतात. शेतजमीनमालक त्या जागेवर रस्ता, वीज, नाली यासारख्या सुविधा उपलब्ध करत नाही. त्यामुळे घर बांधून काही वर्ष झाल्यानंतर नागरिक नगर परिषदेकडे रस्ता, नाली व पाण्याच्या पाईपलाईनसाठी तगादा लावतात. इंदिरानगर, गाेकूलनगर, विवेकानंदनगर आदी ठिकाणी अनेकांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून घरे बांधली आहेत. या घरांवर नगर परिषदेमार्फत घरटॅक्स आकारला जातेा. त्यामुळे नगर परिषदेने रस्ता, नाली, पाणी या मूलभूत सुविधा पुरवाव्या, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे. नगर परिषद घरटॅक्स आकारत असल्याने ही मागणी रास्त सुद्धा आहे. मात्र शहराच्या विस्ताराचा वेग लक्षात घेतला तर नवीन वस्त्यांमध्ये तत्काळ मूलभूत सुविधा पुरविणे शक्य हाेत नाही. काही वस्त्यांमध्ये घरे बांधून अनेक वर्ष झाली. मात्र पक्के रस्ते, पाणी व नाल्या नाहीत.

मुरूम टाकून केली जाते तात्पुरती साेय पावसाळ्यात नगर परिषदेमार्फत शहरात जवळपास ४०० ते ५०० ब्रास मुरूम टाकले जाते. ज्या नागरिकांना जाण्यासाठी रस्ते नाहीत किंवा एखाद्या ठिकाणी चिखल निर्माण झाले आहे, अशा ठिकाणी मुरूम टाकून तात्पुरता मार्ग उपलब्ध करून दिला जाते. त्यामुळे ये-जा करण्याची थाेडीफार साेय झाली आहे. अनेक वस्त्यांमध्ये नळाची पाईपलाईन नव्हती. मात्र मागील सहा महिन्यांपासून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. या कामात शहराचा बराच भाग व्यापला आहे. पाईपलाईन जरी वाढविण्यात आली असली तरी पाणी टाक्यांची क्षमता कमी असल्याने पाणी पुरणार काय, असा प्रश्न आहे. 

घराचे बांधकाम हाेताच नगर परिषदेमार्फत घरटॅक्स आकारला जातेा. त्यामुळे नागरिकांना रस्ता, नाली, वीज, पाणी, आराेग्य या मूलभूत सुविधा पुरविणे ही नगर परिषदेची जबाबदारी आहे. मागील तीन महिन्यांपासून गाेकुलनगरातील माता मंदिर परिसरातील नाल्यांचा उपसा करण्यात आला नाही. त्यामुळे या परिसरातील नाल्या गाळाने तुंबल्या आहेत.      - सुरेंद्र खरवडे, नागरिक

झाशी राणीनगरात घराचे बांधकाम हाेऊन चार वर्षांचा कालावधी झाला. त्यानंतर यावर्षी रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र नाली बांधकाम झाले नाही. नालीचे बांधकाम हाेणे आवश्यक आहे. यासाठी नगर परिषदेने निधी मंजूर करावा. चार महिन्यांपूर्वी नळाची पाईपलाईन टाकली आहे. त्यामुळे पाण्याची समस्या सुटली आहे. - शुभांगी उमाजी भांडेकर, नागरिक

नवीन वस्त्यांमध्ये रस्ते बांधकामाला नगर परिषद नेहमीच प्राधान्य देते. काही  रस्ते व नाल्यांच्या बांधकामाला सुरूवात झाली आहे. बहुतांश वाॅर्डांपर्यंत पाणीपाईपलाईन टाकण्यात आली आहे. पासाळ्यात चिखलाची समस्या निर्माण हाेऊ नये, यासाठी नागरिकांच्या मागणीनुसार मुरूम टाकून दिला जातो.      - संजीव ओहाेळ, मुख्याधिकारी, नगर परिषद, गडचिराेली

 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक