शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

प्रकल्पाला विरोध नाही, पण बाधितांना योग्य लाभ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2022 22:30 IST

लोहखाणीतील उत्खननाला असलेला नक्षली विरोध पाहता सामान्य नागरिकांच्या रूपात येऊन नक्षल्यांकडून घातपाती कृत्य घडवले जाण्याची शक्यता पाहता अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून तपासणी केली जात होती. विशेष १३ गावांतील लोक आणि त्या भागाचे प्रतिनिधित्व करणारे आजी-माजी लोकप्रतिनिधी वगळता कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहखाणीतून वाढीव कच्चा माल काढण्याच्या लॉयड मेटल्स कंपनीच्या प्रस्तावावरील जनसुनावणी गुरूवारी (दि.२७) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झाली. बाधित क्षेत्रातील १३ गावांमधील काही नागरिकांसह अहेरी क्षेत्रातील अनेक लोकप्रतिनिधींनी आपले म्हणणे मांडले. रोजगार देणारे माध्यम म्हणून या खाणीला किंवा वाढीव क्षमतेच्या लिजला आमचा विरोध नाही, पण बाधित गावातील नागरिकांसह एटापल्ली तालुक्यातील इतरही गावांना या माध्यमातून विविध सोयीसुविधांचा लाभ मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.जिल्हाधिकारी संजय मिणा यांच्यासह महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अशोक करे (नागपूर), उपप्रादेशिक अधिकारी ए.पी.सातफळे (चंद्रपूर), अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील, जिल्हा खनिकर्म अधिकारी आर.एन.सोखी आदी यावेळी मंचावर उपस्थित होते. याशिवाय खासदार अशोक नेते, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डाॅ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे यांच्यासह लॉयड मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक एन.प्रभाकरण, कार्यकारी संचालक एस.वेंकटेश्वरन, संचालक अतुल खाडीलकर आदी नागरिकांमध्ये बसले होते.या संपूर्ण सुनावणीचे व्हिडिओ चित्रिकरण करण्यात आली. त्याचा सविस्तर अहवाल राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे पाठविला जाईल. तेथून तो केंद्रीय समितीकडे जाईल. ती समिती वाढीव लिजबद्दलचा निर्णय देईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

हॉलच्या बाहेर दोन स्क्रिनची व्यवस्था-    जनसुनावणीसाठी येणाऱ्या १३ गावांमधील नागरिकांची संख्या पाहता तेवढे लोक हॉलमध्ये बसू शकणार हे पाहून नियोजन भवनाबाहेर पेंडॉल टाकून दोन मोठ्या स्क्रिनवर हॉलमधील लाईव्ह चित्रण दाखविले जात होते. कोण काय बोलत आहे हे ऐकून लोकांमधून त्याला प्रतिसाद दिला जात होता. त्यांच्या जेवणाची व्यवस्थाही त्याच परिसरात करण्यात आली होती.

कडक सुरक्षेचा पत्रकारांनाही फटका-    लोहखाणीतील उत्खननाला असलेला नक्षली विरोध पाहता सामान्य नागरिकांच्या रूपात येऊन नक्षल्यांकडून घातपाती कृत्य घडवले जाण्याची शक्यता पाहता अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून तपासणी केली जात होती. विशेष १३ गावांतील लोक आणि त्या भागाचे प्रतिनिधित्व करणारे आजी-माजी लोकप्रतिनिधी वगळता कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. -    याचा फटका एटापल्लीवरून आलेल्या विविध वृत्तपत्रांच्या तालुका प्रतिनिधींसह जिल्हास्तरावरील पत्रकारांनाही बसला. सुनावणीच्या शेवटच्या टप्प्यात पत्रकारांना पाचारण करण्यात आले. प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या पत्रानुसार ज्या गावातील लाेकांना जनसुनावणीत बोलावायचे होते त्यांनाच हाॅलमध्ये प्रवेशाची अनुमती देण्यात आली, असे जिल्हाधिकारी संजय मिणा यांनी सांगितले.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी