शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चामोर्शी तालुक्यात अग्निशमन यंत्रणाच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 23:54 IST

चामोर्शी शहरासह तालुक्यात गेल्या १५ ते २० दिवसांपासून तापमान वाढले आहे. शिवाय कचरा जाळण्याच्या माध्यमातूनही शहरासह तालुक्यात आग लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सातत्याने मागणी होऊनही शासनाने चामोर्शी शहर व तालुक्यासाठी अग्निशमन यंत्रणा अद्यापही उपलब्ध करून दिली नाही.

ठळक मुद्देशासन व प्रशासनाचे दुर्लक्ष : आगीच्या अनेक घटना घडूनही दखल नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : चामोर्शी शहरासह तालुक्यात गेल्या १५ ते २० दिवसांपासून तापमान वाढले आहे. शिवाय कचरा जाळण्याच्या माध्यमातूनही शहरासह तालुक्यात आग लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सातत्याने मागणी होऊनही शासनाने चामोर्शी शहर व तालुक्यासाठी अग्निशमन यंत्रणा अद्यापही उपलब्ध करून दिली नाही. परिणामी आग वेळेवर आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न होत नसल्याचे दिसून येत आहे.चामोर्शी तालुक्यात मे महिन्यात आग लागून किराणा दुकान जळाल्याची घटना घडली. कुनघाडा मार्गावर शेतातील कचरा जाळताना तणसीचे ढिगही जळून पशुंच्या वैरणाची होळी झाली. अलिकडेच चामोर्शी शहरात लक्ष्मी गेट परिसरात सलुनचे दुकान व पानठेला जळून खाक झाल्याची घटना घडली. तालुक्याच्या बोरी येथे शेतशिवारातील तणसीचे अनेक ढिगही जळाले. यंदाच्या उन्हाळ्यात चामोर्शी शहरासह तालुक्यात आग लागून हजारो रुपयांचे नुकसान झाल्याच्या बऱ्याच घटना घडल्या. दरवर्षीच्या उन्हाळ्यात तालुक्यासह शहरात आग लागण्याच्या अनेक घटना घडत असतात. मात्र या घटनांना आळा घालण्यासाठी पाहिजे त्या प्रमाणात उपाययोजना करण्यात येत नाही.चामोर्शी नगर पंचायतीकडे अग्निशमन यंत्रणेची व्यवस्था नाही. त्यामुळे गडचिरोली, अहेरी व मूल या तीन ठिकाणावरून अग्निशमन वाहन व मनुष्यबळ बोलवावे लागते. या तिनही शहराचे अंतर दूर असल्याने हे वाहन घटनास्थळी पोहोचेपर्यंत घटनास्थळी काहीच उरत नाही. आगीच्या रौद्ररूपात अनेक साहित्य जळून खाक होतात.चामोर्शी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी संजय गंगथडे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, मी रजेवर आहे. अग्निशमन यंत्रणेचा प्रस्ताव आहे किंवा नाही, यासंदर्भात आपण सोमवारी माहिती देऊ, असे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.नगर पंचायतीला अग्निशमन यंत्रणा देण्याची मागणीचामोर्शी तालुक्यात एकूण ७६ ग्रामपंचायती असून ११४ गावे आहेत. सर्वाधिक नऊ जिल्हा परिषद क्षेत्र असून दोन लाखांवर लोकसंख्या आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या तालुक्यात आग लागण्याच्या अनेक घटना सातत्याने घडत असतात. या घटनेतील आग विझविण्याच्या उद्देशाने नगर पंचायत प्रशासनाला शासनाने अग्निशमन यंत्रणा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. सदर मागणीला घेऊन नगर पंचायतीच्या लोकप्रतिनिधींनी सरकारकडे पाठपुरावा केल्यास अग्निशमन वाहन उपलब्ध होऊ शकते. अग्निशमन वाहन उपलब्ध झाल्यास आग आटोक्यात आणून लाखो रुपयांची नुकसान टाळू शकता येते. यासाठी राजकीय व प्रशासकीय इच्छाशक्तीची गरज आहे.

टॅग्स :fireआग