कंपार्टमेंट क्र. ६०६ मध्ये निलगाय ठार झाली असल्याची माहिती येथील रांगी क्षेत्र कार्यालयाला मिळाली. त्यानंतर येथील क्षेत्र सहायक बलवंत येवले यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबद्दल माहिती दिली. धानोरा उत्तरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मस्के या घटनास्थळी पोहोचल्या. निलगायीचा मृतदेह क्षेत्र सहायक कार्यालयात आणण्यात आला. पशुवैद्यकीय अधिकारी डांगे यांनी तपासणी केली असता नीलगायीवर वन्यप्राण्यांनी हल्ला करून जखमी केले असल्याने ती मरण पावली असावी, असा अंदाज लावण्यात आला. रांगी परिसरात बिबट्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे बिबट्यानेच नीलगायीला ठार केले असावे, असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. रांगी येथील मोठा तलाव परिसरात त्या नीलगायीवर अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी वनरक्षक अरुण जाभाेर, आर. पी. कुडावले, एस. एल. ताेराम हजर हाेते.
बिबट्याच्या हल्ल्यात नीलगाय ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:36 IST