शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अंगावरची हळद उतरण्यापूर्वीच नवविवाहितेने संपविली जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 12:49 IST

Gadchiroli News अंगावरची हळद अजून सुकलीही नसताना लग्नाच्या १८ व्या दिवशी नवविवाहितेेने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. सदर घटना रविवारी वडेगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पांडूटोला येथे घडली.

 लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : अंगावरची हळद अजून सुकलीही नसताना लग्नाच्या १८ व्या दिवशी नवविवाहितेेने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. सदर घटना रविवारी वडेगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पांडूटोला येथे घडली. मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेने तिच्या सासर व माहेरच्या गावात शोककळा पसरली आहे.

तालुका मुख्यालयापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या वडेगाव गट ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट पांडूटोला येथील आदेश घाटघूमर या युवकाचे गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील पिंडकेपार येथील तोमेश्वरी नामक मुलीशी २४ फेब्रुवारीला थाटामाटात लग्न झाले. लग्न होऊन ती सासरी आली. दोघेही जण आनंदातच हाेते. शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास तोमेश्वरीने आपल्या पतीला जेवू घातले व सोबत दुपारच्या जेवणाचा डबा करून दिला डबा घेऊन आदेश शहरात इमारतीच्या रंगरंगोटीच्या कामावर निघून गेला. दरम्यान सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास तोमेश्वरीने विष प्राशन केले. तिच्या नाका तोंडातून फेस येत असल्याचे पाहून तिच्या कुटुंबीयांनी तिला कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिला वाचविण्यासाठी येथील डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त केली; परंतु तिच्याकडून उपचाराला प्रतिसाद मिळत नव्हता. रात्री १२ वाजताच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.

टॅग्स :Deathमृत्यू