शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात पोलीस अधिकाऱ्यांची नवी टीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 12:01 IST

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात पोलीस अधीक्षकांसह एकूण तीन नवीन आयपीएस अधिकारी आणि चार उपविभागीय पोलीस अधिकारी रुजू झाले आहेत.

ठळक मुद्देतीन आयपीएस रुजू चार एसडीपीओंसह १८ पीएसआय नवीन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात पोलीस अधीक्षकांसह एकूण तीन नवीन आयपीएस अधिकारी आणि चार उपविभागीय पोलीस अधिकारी रुजू झाले आहेत. याशिवाय नवीन बॅचमधील १८ उपनिरीक्षकही आले आहेत. अजून ३५ उपनिरीक्षक व ५ निरीक्षकांची प्रतीक्षा आहे. या नवीन अधिकाऱ्यांमुळे जिल्हा पोलीस दलापुढील आव्हानांकडे नव्या नजरेने पाहून त्यावर मात करण्याचा प्रयत्न जिल्हा पोलीस दल करणार आहे.महिनाभरापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून डॉ.शैलेश बलकवडे यांनी जिल्ह्याची धुरा हाती घेतली. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक म्हणून मोहीत गर्ग आणि अजितकुमार बंसल हे नुकतेच रुजू झाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) दर्जाच्या अधिकाऱ्यांची संख्या पुन्हा ५ झाली आहे. याशिवाय ११ पैकी गडचिरोली, सिरोंचा, अहेरी आणि धानोरा या ठिकाणचे ४ उपविभागीय पोलीस अधिकारी बदलून दुसऱ्या जिल्ह्यात गेले. त्यांच्या जागी नवीन अधिकारी रुजू झाले आहेत.उपनिरीक्षकांच्या नवीन तुकडीची पहिली पोस्टिंग गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात दिली जाते. त्यापैकी २०११ च्या बॅचमधील ९६ उपनिरीक्षक गडचिरोलीत दाखल झाले होते. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांपूर्वीच त्यातील ९४ उपनिरीक्षकांना या जिल्ह्यातून भारमुक्त करण्यात आले. त्यांच्या जागी १८ नवीन उपनिरीक्षक रुजू झाले आहेत.

३५ उपनिरीक्षक, ५ निरीक्षकांची प्रतीक्षाजिल्ह्यात अजून ३५ उपनिरीक्षकांच्या जागा रिक्त आहेत. याशिवाय धानोरा, आष्टी, आरमोरी या तीन ठाण्यांसह पोलीस अधीक्षक कार्यालयातील दोन निरीक्षकांच्या बदल्या झाल्याने त्यांच्या जागी पाच निरीक्षकांची प्रतीक्षा आहे. हे अधिकारी रुजू झाल्यानंतर बऱ्याच प्रमाणात जिल्हा पोलीस दलातील अधिकारी नवीन दमाचे राहतील.

पाच पोलीस मदत केंद्रांचा प्रस्ताव प्रलंबितजिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हेडरी उपविभागांतर्गत नवीन पाच पोलीस मदत केंद्र निर्माण करण्याचा प्रस्ताव बऱ्याच दिवसांपासून गृह विभागाकडे प्रलंबित आहे. नेडेर, पिलरबुर्गी, मुरेवाडा, तुमरकोटी आणि वेलचूर येथे होऊ घातलेल्या या नवीन पोलीस मदत केंद्रामुळे सुरजागड पहाडावरील लोहखनिज खननासाठी द्याव्या लागणाऱ्या सुरक्षेचा पोलीस दलावरील ताण बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे. दोन महिन्यांपूर्वी पोलीस महासंचालक पडसलगिकर यांनी जिल्ह्याच्या भेटीत या नवीन मदत केंद्रांना मंजुरी देण्याबद्दल सकारात्मकता दर्शविली होती. मात्र राज्य सरकारच्या आकृतीबंधाच्या आडकाठीमुळे अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही.

टॅग्स :Policeपोलिस