शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
3
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
4
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
5
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
6
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
7
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
8
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
9
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
10
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
11
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
12
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
13
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
14
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
15
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
16
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
17
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
18
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
19
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
20
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?

आयुष्याच्या भ्रमंतीत असे थांबणे कधीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 06:00 IST

संपूर्ण देश कोरोना विषाणू संसर्ग या राष्ट्रीय आपत्तीला तोंड देत असताना लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद आहे. संपूर्ण व्यवहार ठप्प पडले आहेत. सकाळी घणाचे घाव देऊन दिवसभर लोखंडाच्या शेती व संसारपयोगी बनविलेल्या विविध वस्तू विकून संध्याकाळी चूल पेटवायची. असा दिनक्रम परराज्यातील गाडीलोहार समाजातील लोकांचा आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । कोरोनाबंदीने पाय थबकले; रोजगारासाठी आलेल्या गाडी लोहार समाजाच्या लोकांपुढे संकट

प्रदीप बोडणे ।लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : बैलगाडीत बिºहाड, हातात काठी, अनवाणी पायांनी अंतर कापत गावाच्या वेशीवर मुक्काम ठोकायचा. तप्त झालेल्या लोखंडाला घनाचे दणादणा घाव घालायचे. शेती व संसारपयोगी लोखंडी साहित्य विकून आपला उदनिर्वाह करायचा, अशाप्रकारची जीवनशैली असलेल्या गाडीलोहार समाजाचे १० ते १५ कुटुंबासमोर कोरोना बंदीने मोठे संकट उभे केले आहे. संपूर्ण आयुष्यात भ्रमंती केली. मात्र अशाप्रकारचे थांबणे एकदाही आले नाही, असा अनुभव गाडीलोहार समाजाच्या लोकांनी सांगितला.संपूर्ण देश कोरोना विषाणू संसर्ग या राष्ट्रीय आपत्तीला तोंड देत असताना लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद आहे. संपूर्ण व्यवहार ठप्प पडले आहेत. सकाळी घणाचे घाव देऊन दिवसभर लोखंडाच्या शेती व संसारपयोगी बनविलेल्या विविध वस्तू विकून संध्याकाळी चूल पेटवायची. असा दिनक्रम परराज्यातील गाडीलोहार समाजातील लोकांचा आहे. मध्यप्रदेशातील इलामपूर येथील रहिवासी असलेल्या आठ ते दहा कुटुंब फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीला कुरखेडा तालुक्याच्या कराडी गावात आले. तलाव परिसरातील या कुटुंबाच्या तात्पुरत्या झोपड्या आहेत. लोखंडापासून कुºहाड, विळे, तावे, नागराची फास व शेतीउपयोगी इतर साहित्य बनविण्याचे काम सदर लोक करतात.प्रशासकीय मदत पोहोचेनाकराडी गावात मध्यप्रदेशातून स्थलांतरित झालेले ८ ते १० कुटुंब व्यवसायाविना अडचणीत सापडले आहेत. कुठेही भटकायचे नाही, अशा सूचना तलाठ्यांनी या लोकांना दिल्या. पोलीस पाटलांनी कुरखेडा तहसीलदारांना या लोकांच्या परिस्थितीची माहिती दिली. मात्र प्रशासनाकडून त्यांना अजूनपर्यंत कोणतीही मदत करण्यात आली नाही.अशी परिस्थिती कधीही पाहिली नाहीलोखंडी वस्तू बनवून त्या विकून उदनिर्वाह करण्यासाठी महाराष्ट्रासह बऱ्याच राज्यात आजवर भटकंती केली. भ्रमंती करताकरताच आमच्या अनेक पिढ्या संपल्या. मात्र कोरोनासारख्या संकटाने जी परिस्थिती आणली ती कधीही निर्माण झाली नाही. अशी परिस्थिती आपण कधीही पाहिली नाही, असा अनुभव परराज्यातून आलेल्या गाडीलोहार समाजाच्या बिºहाडातील प्रमुख कैैलालसिंग ठाकूर यांनी लोकमतपुढे व्यक्त केला. या मोठ्या संकटातून परमेश्वर लवकरच सर्वांना मुक्त करेल, अशी पार्थना त्यांनी हात जोडून देवापुढे केली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसjobनोकरी