आॅनलाईन लोकमतवडेगाव : समाजात व व्यवहारात नित्य नवनवीन बदल होत आहेत. या बदलांना सदैव कुरकुर करीत बसण्यापेक्षा समाजाला अध्यावत ठेवण्यााठी नवीन बदलांची नवीन तत्वे व नवनवीन आव्हाने पेलण्याची क्षमता निर्माण करण्याची गरज आहे. असे प्रतिपादन आ. विजय रहांगडाले यांनी केले.पोवार राजाभोज समिती वडेगावच्या वतीने गांधी चौक वडेगाव येथे पोवार जागृती उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण व आरोग्य सभापती रमेश अंबुले होते. रंगमंच पूजक माजी आ. खुशाल बोपचे, कृउबास सभापती चिंतामण रहांगडाले, राधेलाल पटले, सरपंच तुमेश्वरी बघेले, उपसरपंच छोटेलाल बिसेन, माजी जि.प. सदस्य संभाजी ठाकरे, माजी पं.स. सदस्य तेजराम चव्हाण, ग्रा.पं. सदस्य राजकुमार पटले, लक्ष्मी चौधरी, शामराव बिसेन, सत्यशिला ठाकरे, यादोराव बिसेन, निलकंठ बिसेन उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांनी पोवार समाज जागृती उत्सव व वस्तुस्थिती यावर प्रकाश टाकला. माजी आ. खुशाल बोपचे यांनी राज्य व राष्टÑीय पातळीवार समाज बांधवावर होत असलेल्या अन्यायालाला वाचा फोडत पुढील वाटचालींवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष तेजराम चव्हाण, संचालन मोरेश्वर ठाकरे व आभार निलकंठ बिसेन यांनी मानले.तत्पूर्वी संपूर्ण दिवसभर चालेल्या पोवार जागृती उत्सवाची सुरुवात सकाळी ग्राम स्वच्छता रॅलीने करण्यात आली. सरपंच तुमेश्वरी बघेले यांच्या अध्यक्षतेखाली पं.स. सभापती निता रहांगडाले यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरूवात केली. या वेळी पाहुणे म्हणून पुरणलाल टेंभरे, एच.एम. रहांगडाले, प्रवीण अंबुले, सुनील टेंभरे, राजकुमार पटले, दिलीप बिसेन, भाकचंद बिसेन उपस्थित होते. पोवार जागृती उत्सव यश्स्वी करण्यासाठी पोवार राजाभोज समिती, पोवार नवयुवक समिती, पोवार महिला समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
नवीन तत्त्वे व आव्हाने पेलण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:04 IST
समाजात व व्यवहारात नित्य नवनवीन बदल होत आहेत. या बदलांना सदैव कुरकुर करीत बसण्यापेक्षा समाजाला अध्यावत ठेवण्यााठी नवीन बदलांची नवीन तत्वे व नवनवीन आव्हाने पेलण्याची क्षमता निर्माण करण्याची गरज आहे. असे प्रतिपादन आ. विजय रहांगडाले यांनी केले.
नवीन तत्त्वे व आव्हाने पेलण्याची गरज
ठळक मुद्देविजय रहांगडाले : वडेगाव येथे पोवार जागृती उत्सव, विविध मान्यवरांची उपस्थिती