शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

सिरोंचाला जादा बसेसची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 01:31 IST

तेलंगणा-छत्तीसगड राज्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याने सिरोंचा येथे तेलंगणा राज्यातून येणाऱ्या प्रवासी वाहनांची संख्या वाढली आहे.

ठळक मुद्देआगार निर्माण करण्याची मागणी : तेलंगणातून वर्दळ वाढल्याने प्रवाशांची गैरसोय

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तेलंगणा-छत्तीसगड राज्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याने सिरोंचा येथे तेलंगणा राज्यातून येणाऱ्या प्रवासी वाहनांची संख्या वाढली आहे. येथे दररोज हजारो प्रवाशी दाखल होत असल्याने त्यांच्या सुविधेसाठी सिरोंचात बस आगार तसेच जादा तसेच आरामदायी बसेसची आवश्यकता निर्माण झाली आहे.तेलंगणा व छत्तीसगड राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. सदर महामार्ग सिरोंचा तालुक्यातून जाणार आहे. निजामाबाद ते जगदलपूर हा राष्ट्रीय महामार्ग असून या महामार्गावरील इंद्रावती व प्राणहिता नदीवरील पुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात पोहोचले आाहे. शिवाय गोदावरी नदीवरील पूल झाल्याने तेलंगणा राज्यातून सिरोंचात शेकडो बसगाड्या येतात. त्यामुळे सिरोंचा येथे बसेस ठेवण्यासाठी जागा उरत नाही. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी तालुक्यात दौरा करून सिरोंचातील हायटेक बसस्थानकाकरिता पाच कोटी रूपये देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे बसस्थानकाचे काम के व्हा सुरू होणार, याची प्रतीक्षा नागरिकांना आहे.सिरोंचा येथे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व अन्य प्रवाशांची गर्दी राहात असल्याने पासेस व अन्य सुविधांकरिता आगाराची गरज आहे. व्यापाऱ्यांना नागपूर, गडचिरोलीवरून बसने आल्यास प्रवासामुळे बराच त्रास सहन करावा लागतो.बिघाड आल्यास मन:स्तापकाही दिवसांपूर्वी गर्कापेठा जंगलात बसमध्ये बिघाड आल्याने तीन ते चार तास प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. सिरोंचा येथे आगार अथवा जादा बसगाड्या असत्या तर प्रवाशांना तत्काळ सेवा उपलब्ध झाली असती. गडचिरोली व अहेरीपर्यंतचे अंतर अतिशय दूर असल्याने अतिरिक्त बस वेळीच पोहोचत नाही. त्यामुळे बस आगाराची निर्मिती करावी, तसेच सिरोंचा ते नागपूर यामार्गे बससेवा सुरू करावी.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ