शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कडक बंदोबस्तानंतरही आढळली नक्षली पत्रके व बॅनर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2018 21:19 IST

शनिवारपासून (दि.२८) सुरू झालेल्या नक्षल शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

गडचिरोली : जिल्ह्यात शनिवारपासून (दि.२८) सुरू झालेल्या नक्षल शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र तरीही अहेरी तालुक्यात कमलापूर आणि कुरखेडा तालुक्यातील पलसगड येथे नक्षल्यांचे बॅनर, पत्रके आढळून आली. धानोरा, एटापल्ली तालुक्यातही काही ठिकाणी वाहतूक आणि बाजारपेठेवर परिणाम जाणवला. यावर्षी नक्षल सप्ताह पाळण्यासंदर्भात पलसगड येथील प्रवासी निवा-यावर नक्षली बॅनर आणि लाल झेंडा लावल्याचे सकाळी आढळले. पोलिसांनी जाऊन ते बॅनर व झेंडा काढला. मात्र यामुळे दहशत पसरत शेतीची कामे बंद ठेवण्यात आली. शिवाय दुकानदारांनी आणि खासगी वाहतूकदारांनी बंद पाळला. अहेली तालुक्यात कमलापूर येथे नक्षली पत्रके आढळली. अहेरी एरिया कमिटीच्या वतीने लावलेल्या त्या पत्रकांवर विविध माहिती देऊन बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले.एटापल्ली-जाराबंडी-गट्टा मार्गावरील वाहतूकही बंद होती. कुरखेडा तालुक्यातील धानोरी, चाराभट्टी, जोशीटोला या गावांत नक्षली दहशतीमुळे रोवणीची कामे बंद होती. धानोरा तालुक्यातील मुरूमगावमध्ये सकाळपासून मार्केट बंद होते. मात्र सकाळी ११ ते १२ वाजताच्या सुमारास पोलिसांनी येऊन दुकाने उघडण्याचे आवाहन केल्यानंतर काही वेळ दुकाने सुरू होती. मात्र पुन्हा दुकाने बंद झाली. कोरची या तालुका मुख्यालयी नक्षली सप्ताह किंवा बंदच्या वेळी दहशतीचे वातावरण असते. मात्र यावेळी ब-यापैकी दुकाने सुरू असल्याचे दिसून आले.

नागरिकांचा शांती मार्चनागरिकांमधील दहशतीचे वातावरण कमी व्हावे आणि नक्षलींना त्यांचा विरोध असल्याचे दिसून यावे म्हणून पोलिसांच्या पुढाकाराने अनेक ठिकाणी शांती मार्च काढला जात आहे. यात नक्षलविरोधी घोषणा देण्यासोबतच त्यांचा निषेध करणारे फलकही झळकत आहेत.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादी