शहरं
Join us  
Trending Stories
1
या पॉश रस्त्याला दिले जाणार डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव! ते ही भारतात...; मुख्यमंत्र्यांची घोषणा अन् भाजपा भडकली...  
2
मोठी बातमी! कुख्यात 22 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; महाराष्ट्र-छत्तीसगड-मध्य प्रदेश नक्षलमुक्त
3
रुपया पुन्हा घसरला! डॉलरच्या तुलनेत ९०.११ च्या नीचांकी स्तरावर; महत्त्वाचं कारण आलं समोर
4
इंडिगोची कार्यसंस्कृती अशी आहे...? माजी कर्मचाऱ्याचे ओपन लेटर व्हायरल; '₹18,000 पगारात 3 लोकांचे काम'
5
काश्मीरमध्ये विनापरवाना फिरताना सापडला चिनी नागरिक, फोनमधून समोर आली धक्कादायक माहिती
6
Nagpur: वाघांना माणूस खाऊ घालणारी ही कसली वनपर्यटनाची नीती? दहशतीत जगणाऱ्या विदर्भातील माणसांचा सवाल
7
दुभाजक ओलांडताना धडक, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा गीता हिंगे यांचा अपघाती मृत्यू; पतीसह चालक गंभीर जखमी
8
Psycho Killer Poonam : "माझ्या मुलीसारखं पूनमलाही तडफडून-तडफडून मारा"; जियाच्या आईचा सायको किलरबद्दल मोठा खुलासा
9
ऑनलाईन गेम खेळताना गमावले ६३ हजार; २६ वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल, म्हणाली...
10
विरोधी पक्षनेतेपदावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप; अधिवेशन काळात रिक्त राहणार पद?
11
Haridwar: बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या शौर्य यात्रेवर दगडफेक, कार्यकर्त्यांचा रस्त्यावर गोंधळ!
12
'इंडिगो'वर 'अशी' वेळ का आली? पायलट्सनीच सांगितलं खरं कारण; FDTL नियम मागे घेण्यासाठी दबावतंत्राचा वापर?
13
२४ रुपयांच्या वांग्यांच्या नादात लागला ₹८७,००० चा चुना, एका चुकीच्या कॉलनं 'गेम'च झाला
14
Russia Ukraine War: 52 लाखांच्या मोहात फसला, रशियात गेलेला हरयाणाचा २१ वर्षीय अनुज थेट युद्धभूमीवर अडकला
15
पोलीस निरीक्षकाचा संशयास्पद मृत्यू; खोलीतून किंचाळत बाहेर पडलेल्या महिला कॉन्स्टेबलला अटक
16
मुलींना येतात 'दाढी-मिशा'; फक्त हार्मोन्समुळे नाही तर 'ही' आहेत कारण, WHO चे डॉक्टर म्हणतात...
17
'या' स्टार क्रिकेटपटूचा टेस्ट आणि टी-२० मधून निवृत्ती मागे घेण्याचा निर्णय, चाहते झाले खूश!
18
आयएसआय आणि 'तामिळनाडू'चा उल्लेख! बिहारच्या राजगीर आयुध कारखान्याला बॉम्बने उडवण्याची धमकी
19
पाकिस्तानच्या तुरुंगातील महिलेवर फिदा झाला अन् थेट सीमा पार करायला निघाला भारताचा बीटेक ग्रॅजुएट!
20
Aadhaar News: आधार फोटोकॉपीवर बंदी... लवकरच येणार कडक नियम, नक्की काय आहे सरकारचा प्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

दुभाजक ओलांडताना धडक, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा गीता हिंगे यांचा अपघाती मृत्यू; पतीसह चालक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 12:27 IST

‎नागपूरवरून काम आटोपून हिंगे दांपत्य आपल्या कारने गडचिरोलीकडे जात होते. पाचगाव जवळून जात असताना दुभाजक ओलांडून आलेल्या एका वाहनाने त्यांच्या कारला मागून जोरात धडक दिली.

‎गडचिरोली : आधारविश्व फाउंडेशनच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी (अजित पवार) महिला प्रदेश उपाध्यक्षा गीता सुशील हिंगे (वय ५३) यांचा रविवारी (७ डिसेंबर) मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. पती सुशील हिंगे (वय ५७) गंभीर जखमी आहेत. गडचिरोली-नागपूर महामार्गावरील उमरेड तालुक्यातील पाचगावजवळ घडलेल्या या दुर्घटनेने गडचिरोलीत शोककळा पसरली आहे. ‎‎नागपूर येथील काम आटोपून हिंगे दांपत्य आपल्या कारने गडचिरोलीकडे परतत होते. रविवारी रात्री उशिरा पाचगाव जवळून जात असताना साडेबारा वाजता दुभाजक ओलांडत आलेल्या एका वेगवान वाहनाने त्यांच्या कारला मागून भीषण धडक दिली. 

धडकेत मधल्या सीटवर बसलेल्या गीता हिंगे यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि काही क्षणातच त्यांची प्राणज्योत मालवली. सुशील हिंगे आणि वाहनचालक हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ नागपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

गीता हिंगे यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सायंकाळी पाच वाजता कठाणी नदी तीरावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.‎‎कोरोना संकटात गरजूंना मदत…‎‎गीता हिंगे सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देत काम करत होत्या. आधार विश्व फाउंडेशनच्या माध्यमातून कोरोना काळात त्यांनी अक्षरशः शेकडो रुग्णांसाठी घरगुती अन्नाचे डबे पोहोचवले; मृत्यू झालेल्या रुग्णांच्या घरात जायला नातेवाईकही घाबरत असताना अंत्यसंस्काराची जबाबदारी त्यांनी स्वतः उचलली. 

विधवांसाठी मकरसंक्रातीला आयोजित केलेला हळदी-कुंकू कार्यक्रम हा तर त्यांच्या समाजकार्यातील संवेदनशीलतेचा मोठा दाखला. समाजाने या महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, हे त्यांचे वाक्य आजही अनेकांना आठवते.

नाराजीनाट्यानंतर भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश‎‎भाजपमध्ये महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा, जिल्हा महामंत्री अशी महत्त्वाची पदे भूषवताना त्यांनी अनेक महिला कार्यकर्त्यांना राजकारणात स्थान निर्माण करून दिले. 

नगरपालिका निवडणुकीतील नाराजीनाट्यानंतर  भाजपला रामराम करत त्यांनी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत मित्रपक्ष राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. प्रवेश होताच त्यांची निवड महिला प्रदेश उपाध्यक्षा पदी झाली. राजकारणात नेतृत्वगुण व सामाजिक भान ठेऊन काम करणाऱ्या नेत्या म्हणून त्यांची ओळख  होती.-----

English
हिंदी सारांश
Web Title : NCP Leader Geeta Hinge Dies in Accident; Husband, Driver Injured

Web Summary : NCP's Geeta Hinge died in a road accident near Gadchiroli. Her husband and driver are seriously injured. Hinge was known for social work, especially during the pandemic, and had previously been a BJP leader.