लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सर्वसामान्य जनता व शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी राष्टÑवादी काँग्रेस पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने शुक्रवारी स्थानिक इंदिरा गांधी चौकात निदर्शने करण्यात आली. त्यानंतर तहसीलदार दामोधर भोयर यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सोनाली पुण्यपवार, रायुकाँचे अध्यक्ष प्रा.रिंकू पापडकर, जिल्हाउपाध्यक्ष फहीम काजी, शहर अध्यक्ष नितीन खोबरागडे, विनायक झरकर, तुकाराम पुरणवार, मुस्ताक शेख, नजामुद्दी खॉ मौलाना, प्रभाकर बारापात्रे, जुगनूसिंग पटवा, अक्षय बोकडे, शंकर दिवटे, विजय चंदुकवार, राजू नैताम, कुमार बारसागडे, विवेक बाबनवाडे, डॉ.देविदास मडावी, लोमेश भानारकर, गणेश जुमनाके, संजय सिंगाडे, जे.एम.मुपीडवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा, ग्रामीण भागातील भारनियमन बंद करावे, पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ मागे घ्यावे, जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, अल्पसंख्यांक समाजाला ५ टक्के आरक्षण देण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे. यावेळी राकाँच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप्रणीत सरकारच्या धोरणाचा निषेध केला.
राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 01:39 IST
सर्वसामान्य जनता व शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी राष्टÑवादी काँग्रेस पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने शुक्रवारी स्थानिक इंदिरा गांधी चौकात निदर्शने करण्यात आली. त्यानंतर तहसीलदार दामोधर भोयर यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने
ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा