शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण गडचिरोलीत नक्षल्यांचा धुडगूस सुरूच; आज बंदची हाक, झाड तोडून रस्त्यावर टाकले, पोस्टरही लावले

By संजय तिपाले | Updated: December 22, 2023 09:53 IST

बिहार, झारखंड, उत्तर प्रेदशातील प्रतिक्रांतिकारी हल्ल्यांविरोधात २२ डिसेंबर रोजी माओवादी संघटनेने भारत बंदची हाक दिली होती.

गडचिरोली : बिहार, झारखंड, उत्तर प्रेदशातील प्रतिक्रांतिकारी हल्ल्यांविरोधात २२ डिसेंबर रोजी माओवादी संघटनेने भारत बंदची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री नक्षल्यांनी दक्षिण गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात झाड तोडून रस्त्यावर टाकले तर पोस्टर लावून जनआंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नक्षल्यांचा पीएलजीए सप्ताह झाला. यात तीन निष्पाप नागरिकांची हत्या केल्याने खळबळ उडाली होती. २१ डिसेंबर रोजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना तोडगट्टा आंदोलनावरून इशारा देणारे पत्रक जारी करणाऱ्या नक्षल्यांचा दक्षिण गडचिरोलीमध्ये धुडगूस सुरूच आहे. गुरुवारी रात्री नक्षल्यांनी भामरागड - आलापल्ली रस्त्यावरील बेजूर फाट्यालगत झाड तोडून रस्त्यावर टाकले तर भामरागड- लाहेरी रोडवर पोस्टर लावल्याचा प्रकार समोर आला. झाड रस्त्यावर टाकल्याने भामरागड- आलापल्ली रस्ता काही वेळ बंद होता. पोलिसांनी झाड हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.परिसरात दहशत

दक्षिण गडचिरोलीमध्ये नक्षली पुन्हा सक्रिय झाल्याने दहशत निर्माण झाली आहे. भारत बंदच्या आवाहनानंतर पोलीस सतर्क झाले होते. नक्षल्यांचा मुकाबला करण्यासाठी पोलिसांनी देखील व्यूहरचना आखली असून नक्षलविरोधी अभियान गतिमान केले आहे.