शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

'मेडीगड्डा'बाबत नक्षल्यांचेही पत्रक, 'केसीआर' यांच्यावर घोटाळ्याचे आरोप!

By संजय तिपाले | Updated: October 28, 2023 17:42 IST

नक्षल्यांनीही तेलगू भाषेत पत्रक काढून मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्यावर गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. 

गडचिरोली : महाराष्ट्र- तेलंगणा सीमेवरील मेडीगड्डा धरणावरील पुलाचे तीन खांब खचल्याने तेलंगणात सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकारण तापले आहे. काँग्रेस व भाजपने केसीआर सरकारवर टीकेची झोड उठवली असताना आता नक्षल्यांनीही तेलगू भाषेत पत्रक काढून मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्यावर गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत.  महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील सिरोंचाजवळील मेडीगड्डा धरणावरील पुलाचे तीन खांब खचल्याचा प्रकार २१ ऑक्टोबरला रात्री घडला होता. त्यानंतर तातडीने तेलंगणा सरकारने महाराष्ट्राला जोडणाऱ्या एक किलोमीटरच्या पुलावरील वाहतूक बंद करून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला. या घटनेचा शोध घेण्यासाठी धरणातील पाणी सोडण्यात आल्याने महराष्ट्रातील सिरोंचा तालुक्याला याचा फटका बसला. सिरोंचा तालुक्यातील २० ते २५ गावांतील शेतकऱ्यांचे कृषीपंप, शेतीसाहित्य वाहून गेले. अचानक पाण्याचा विसर्ग वाढल्याने अनेकांची शेती बुडाली, काही जनावरे वाहून गेली. यामुळे धरणाच्या बांधकामावर प्रश्न निर्माण झाले आहे. 

तेलंगणात सद्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्याविरोधात विरोधकांना आयते कोलित मिळाले. काँग्रेस नेते राहुल गांधी, केंद्रीय पर्यटन, सांस्कृतिक मंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष जी.किशन रेड्डी यांनीही केसीआर सरकारवर प्रहार केला. आता या वादात  नक्षलवाद्यांनी उडी घेतली असून त्यांनी तेलुगुतून एक पत्रक काढले आहे. समाजमाध्यमावर सार्वत्रिक झालेल्या या पत्रकात नक्षल्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी देखील या सिंचन प्रकल्पात मोठे कमिशन घेतल्याचेही म्हटले आहे. 

...म्हणून तेव्हा पोलिस बंदोबस्त धरणाच्या बांधकामावेळी गैरव्यवहार लपविण्यासाठी केसीआर सरकारने मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. माध्यमांना देखील धमकवण्यात आले. आज या बांधकामाला तडे जात असल्याने घोटाळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. भविष्यात यामुळे होणाऱ्या नुकसानीला मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव जबाबदार राहतील असेही पत्रकात नमूद आहे. हे पत्रक तेलंगणात सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीK Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावtelangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३Telanganaतेलंगणा