शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हिद्दूरमध्ये रस्ता बांधकामावरील वाहनांची नक्षल्यांकडून जाळपोळ; छत्तीसगड सीमेवरील घटना

By संजय तिपाले | Updated: December 20, 2023 11:14 IST

पत्रक टाकून २२ डिसेंबरला भारत बंदची हाक

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील छत्तीसगड सीमेवरील अतिदुर्गम हिद्दूर गावात १९ डिसेंबरला मध्यरात्री नक्षल्यांनी रस्त्याच्या बांधकामावरील वाहने पेटवून दिली. घटनास्थळी नक्षल्यांनी एक पत्रक सोडले, त्यात २२ बिहार, झारखंड,उत्तर प्रदेशमधील प्रतिकांतिकारी हल्ल्यांविरोधात २२ डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. भामरागडपासून दहा किलोमीटरवर छत्तीसगड सीमेलगत हिद्दूर- दोबूर आणि पुढे कोयरकोटी जोडणाऱ्या रस्त्याचे  काम सुरू आहे. बुधवारी मध्यरात्री नक्षल्यांनी बांधकामस्थळी असलेल्या वाहनांची जाळपोळ केली. यात एक जेसीबी, टँकरचा समावेश आहे. यावेळी तेथे पत्रक सोडण्यात आले. या पत्रकात बिहार, झारखंड, उत्तर प्रदेशात प्रतिक्रांतिकारी हल्ले वाढल्याने या विरोधात १६ ते २२ डिसेंबर दरम्यान देशव्यापी प्रचार आंदोलन सुुरु असल्याचा दावा केला आहे. याचाच एक भाग म्हणून २२ डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिली असून हा बंद यशस्वी करा असे आवाहन केले आहे. मध्यरात्री रस्ता बांधकामावरील वाहनांची जाळपोळ केल्याची घटना घडली आहे. हा अतिदुर्गम भाग आहे. भामरागड ठाण्यात गुन्हा नोंदवून तपास केला जाईल. नक्षलविरोधी अभियान अधिक प्रभावीपणे राबवू.- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक

रस्ता कामाला होता विरोध

दरम्यान, या रस्ता कामाला नक्षल्यांचा सुरुवातीपासूनच विरोध हाेता. हा भाग नक्षलप्रभावित व संवेदनशील आहे. छत्तीसगड सीमेलगतच्या या रस्त्याचे बांधकाम झाल्यानंतर नागरिकांचे अवागमन वाढेल व गोपनिय हालचालींवर बंधने येतील, यामुळे नक्षल्यांनी वाहने जाळून पोलिसांना आव्हान दिल्याचे सूत्रांनी सांगितले.