शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

नक्षल्यांचा बंद कामाचा नाही, आम्हाला हवा विकास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 05:00 IST

पाच वर्षांपूर्वी, म्हणजे ७ डिसेंबर २०१६ रोजी जुवी नाल्यावर श्रमदानातून पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले होते. या पुलामुळे गावकऱ्यांना नाला ओलांडून पलीकडच्या गावात जाणे-येणे सोयीचे झाले. त्या पुलाच्या बांधकामाची पंचवर्षेपूर्ती झाल्याचे औचित्य साधून धोडराज पोलीस मदत केंद्राच्या पोलिसांनी एरिया डॉमिनेशन अभियानांतर्गत गावकऱ्यांच्या उपस्थितीत पुलाजवळच कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

लाेकमत न्यूज नेटवर्कभामरागड : भामरागडवरून छत्तीसगडला जोडणाऱ्या मार्गावरील  जुवी नाल्यावर जनसंघर्ष समिती आणि पोलीस प्रशासनाच्या पुढाकाराने श्रमदानातून उभारलेल्या जुवी नाल्याला ७ डिसेंबरला पाच वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त पोलीस विभागाकडून आयोजित कार्यक्रमाला गावातील महिला- पुरुषांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शविली. नक्षल्यांच्या पीएलजीए सप्ताहात त्यांच्या बंदच्या आवाहनाला न जुमानता नागरिकांनी दर्शविलेली ही उपस्थिती ‘आम्हाला तुमचा बंद नको, विकास हवा’ हा संदेश देणारी ठरली आहे. पाच वर्षांपूर्वी, म्हणजे ७ डिसेंबर २०१६ रोजी जुवी नाल्यावर श्रमदानातून पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले होते. या पुलामुळे गावकऱ्यांना नाला ओलांडून पलीकडच्या गावात जाणे-येणे सोयीचे झाले. त्या पुलाच्या बांधकामाची पंचवर्षेपूर्ती झाल्याचे औचित्य साधून धोडराज पोलीस मदत केंद्राच्या पोलिसांनी एरिया डॉमिनेशन अभियानांतर्गत गावकऱ्यांच्या उपस्थितीत पुलाजवळच कार्यक्रमाचे आयोजन केले होते. एकीकडे नक्षल्यांनी २ डिसेंबरपासून नक्षल सप्ताह साजरा करण्याचे आवाहन केले असतानादेखील त्याला न जुमानता सदर कार्यक्रमात परिसरातील नागरिक  सहभागी झाले. 

नक्षलविरोध झुगारून उभारला होता पूल

गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरच्या भामरागड तालुक्यातील नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील क्षेत्रात छत्तीसगड मार्गावर नेलगुंडा, कवंडे ही गावे येतात. अनेक वर्षांपासून जुवी नाल्यावरील पूल बांधकामाला नक्षल्यांचा विरोध होता. मात्र, त्याला न जुमानता ७ डिसेंबर २०१६ धोडराज पोलीस मदत केंद्र आणि जनसंघर्ष समितीच्या पुढाकाराने श्रमदानातून पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. त्याची आठवण म्हणून एसडीपीओ नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली धोडराज मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी राजाभाऊ घाडगे, जनसंघर्ष समितीचे संचालक दत्ता शेरके यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी नागरिकांनी आम्हाला विकास हवा, गावोगावी रस्ता पाहिजे, अशी मागणी केली.

 

टॅग्स :naxaliteनक्षलवादी