शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली भागात नक्षल्यांकडून गोळ्या झाडून युवकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 19:52 IST

नक्षल समर्थक म्हणून पोलिसांकडे नोंद असलेल्या युवकाची बुधवारी नक्षल्यांनीच भर बाजारात गोळ्या झाडून हत्या केली. ईरपा बिरा उसेंडी (३०) रा.अपनपल्ली असे मृताचे नाव आहे. ही घटना बुरगी येथे दुपारी २.३० वाजता घडली.

ठळक मुद्देमृतक नक्षल समर्थक : पैशाचा घोळ केल्याचा संशय

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षल समर्थक म्हणून पोलिसांकडे नोंद असलेल्या युवकाची बुधवारी नक्षल्यांनीच भर बाजारात गोळ्या झाडून हत्या केली. ईरपा बिरा उसेंडी (३०) रा.अपनपल्ली असे मृताचे नाव आहे. ही घटना बुरगी येथे दुपारी २.३० वाजता घडली.प्राप्त माहितीनुसार, ईरपा उसेंडी काही नातेवाईकांसोबत बुरगीच्या आठवडी बाजारालगत भरलेल्या कोंबड बाजारात गेला होता. सर्वजण बाजारात व्यस्त असताना अचानकटायर फुटल्यासारखा आवाज आला. आणि क्षणार्धात ईरपा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्यामुळे एकच पळापळ सुरू झाली. दोन नक्षलवाद्यांनी ईरपाच्या डोक्यात एक गोळी तर दुसरी हवेत झाडली होती.विशेष म्हणजे बुरकी गावातील उपपोलीस स्टेशन घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर आहे. पण एकही पोलीस कर्मचारी बाहेर निघाला नाही. बाहेरचा कोलाहल लक्षात येताच पोलिसांनी ठाण्यातील धोक्याची घंटा वाजविली. पण तोपर्यंत दोन्ही नक्षलवादी जंगलाच्या दिशेने पसार झाले होते.दलम कमांडरचा भाऊविशेष म्हणजे मृत ईरपा उसेंडी हा नक्षल्यांचा दलम कमांडर साईनाथचा चुलत भाऊ असून नोटाबंदीच्या काळात नक्षल्यांना पैसे लपविण्यास मदत केल्याच्या आरोपात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. डिसेंबर २०१६ मध्ये सुरजागड प्रकल्पावरील लोहखनिज उत्खननादरम्यान नक्षल्यांनी ७८ वाहने जाळली होती. त्यानंतर नक्षल्यांशी झालेल्या वाटाघाटीत ईरपाने घोळ केल्याचा संशय होता. त्यातूनच ही हत्या झाल्याची चर्चा आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीMurderखून