शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत तेंदूपत्ता केंद्रावरील दिवाणजींची नक्षलवाद्यांकडून निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 16:00 IST

तेंदूपत्ता संकलन केंद्रावर दिवाणजी म्हणून काम पाहणाऱ्या एका इसमाला नक्षलवाद्यांनी घरातून जंगलात नेऊन निर्घृण हत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.

ठळक मुद्देखबरी असल्याचा संशयरात्री घरातून धमकावत नेले जंगलात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तेंदूपत्ता संकलन केंद्रावर दिवाणजी म्हणून काम पाहणाऱ्या एका इसमाला नक्षलवाद्यांनी घरातून जंगलात नेऊन निर्घृण हत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. अंताराम पुडो (५८) असे मृत इसमाची नाव असून ते कुरखेडा तालुक्यातील खोब्रामेंढा येथील रहिवासी होते. पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून त्यांची हत्या झाली आहे.प्राप्त मांहतीनुसार, अंताराम पुडो हे तेंदुपत्ता संकलन केंद्रावर दिवाणजी म्हणून काम पहात होते. रविवारी रात्री ९ ते १० वाजताच्या सुमारास काही बंदुकधारी नक्षलवाद्यांनी पुडो यांच्या घरी येऊन सोबत चलण्याची फर्मान सोडले. यावेळी त्याच गावातील इतरही दोन इसमांनी नक्षलवाद्यांनी जंगलात नेले. तिथे तिघांचीही विचारपूस केल्यानंतर इतर दोघांना सोडण्यात आले. पण पुडो यांना जबर मारहाण केली. त्यानंतर धारदार शस्त्राने गळा कापून जिवे मारले व त्यांचा मृतदेह गावाजवळील रस्त्यावर आणून टाकला. मृतदेहाजवळ एक चिठ्ठीही सापडली असून त्यात पुडो हे पोलीस खबºया असल्याचा संशय व्यक्त केला आहे.खोब्रामेंढा परिसरात टिपगड दलम सक्रिय आहे. परंतू अलिकडे नक्षलवाद्यांची दहशत बरीच कमी झाली आहे. त्यामुळे पुन्हा दहशत प्रस्थापित करण्यासाठी ही हत्या झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान पोलिसांनी त्या भागात गस्त वाढविली असून नक्षलवाद्यांचा शोध घेतला जात आहे.

खोब्रामेंढातील तिसरी हत्यानक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांचा अनुभव खोब्रामेंढा या गावाने यापूर्वीही घेतला आहे. याआधी सदर गावातील पंचायत समिती सदस्य आणि सरपंचाची हत्या नक्षल्यांनी केली होती. त्यामुळे या गावात निवडणूक लढण्यासाठी कोणीही नामांकन दाखल करीत नव्हते. काही महिन्यांपूर्वीच छत्तीसगड पोलिसांपुढे आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल कमांडर पहाडसिंगकडे या भागाची जबाबदारी होती. मात्र अलिकडे नक्षली दहशत कमी करण्यात पोलिसांना बऱ्याच प्रमाणात यश आले होते. या गावाच्या परिसरात चकमकीत ८ नक्षलवाद्यांना पोलिसांनी यमसदनी पाठविले होते. तेव्हापासून कोणत्याही नक्षली कारवाया या भागात झाल्या नव्हत्या.

टॅग्स :Murderखून