शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत गावक-यांनी जाळले नक्षलवाद्यांचे बॅनर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2018 19:17 IST

कसनासूर-बोरिया येथील चकमकीविरोधात १९ ते २५ मेदरम्यान नक्षलवाद्यांकडून शहीद सप्ताहानिमित्त बंद पुकारण्यात आला. यासंदर्भात काही ठिकाणी बॅनर व पत्रके टाकल्याने दहशतीचे वातावरण असले तरी कुमारगुडा फाटा येथे गावक-यांनी नक्षली बॅनरची होळी करून निषेध व्यक्त केला.

 

गडचिरोली  - कसनासूर-बोरिया येथील चकमकीविरोधात १९ ते २५ मेदरम्यान नक्षलवाद्यांकडून शहीद सप्ताहानिमित्त बंद पुकारण्यात आला. यासंदर्भात काही ठिकाणी बॅनर व पत्रके टाकल्याने दहशतीचे वातावरण असले तरी कुमारगुडा फाटा येथे गावक-यांनी नक्षली बॅनरची होळी करून निषेध व्यक्त केला.आलापल्ली-भामरागड मार्गावरील मौजा कुमारगुडा फाटा येथे नक्षल्यांनी लावलेले बॅनर गावकºयांनी काढून त्याची होळी केली. नक्षलवाद्यांच्या बंदच्या आवाहनाला कुमारगुडाच्या नागरिकांनी विरोध दर्शवून नक्षलविरोधी घोषणाही दिल्या. दरम्यान भामरागड तालुका मुख्यालयापासून ५ ते ६ किमी अंतरावर बॅनर आणि पत्रके आढळल्याने गडचिरोली-लाहेरी आणि नागपूर-भामरागड या दोन्ही बसगाड्यांना सोमवारी सायंकाळी माघारी फिरत ताडगाव पोलीस ठाण्यात बसेस जमा कराव्या लागल्या. नागपूर-भामरागड ही बस भामरागडला मुक्कामी येत होती. पण बस तेथूनच परत गेली. मागील महिन्यात पोलिसांशी झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांचे मोठे  नुकसान झाले. नक्षल्यांच्या मोठ्या कॅडरमधील लोकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे नक्षलवाद्यांनी ठिकठिकाणी पत्रके आणि बॅनर लावून शहीद सप्ताह पाळण्याचे आवाहन केले. याचाच भाग म्हणून तीन दिवसांपूर्वी तलवाडा येथे वनविभागाचे २३ बीट नक्षल्यांनी जाळून आणि मार्गात झाडे आडवी टाकून मार्ग अडविला होता. सोमवारी सायंकाळी पुन्हा आलापल्ली-भामरागड मुख्य मार्गावर नक्षलवाद्यांनी पत्रके आणि बॅनर बांधल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादीnewsबातम्या