शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

नक्षल्यांकडून सहा महिन्यांसाठी युद्धविराम; बाह्य सुरक्षेला प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 11:48 IST

करेगुट्टा अभियानात २६ नक्षल्यांचा खात्मा : सरकार आत्मसमर्पणावर ठाम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तीन राज्यांच्या सीमेवर करेगट्टा पहाडावर गेल्या १८ दिवसांपासून सुरू असलेले देशतील सर्वात मोठ माओवाद विरोधी अभियान आता सहा महिन्यांसाठी थांबवण्यात आले आहे. २६ माओवाद्यांना या अभियानात कंठस्नान घालण्यात सुरक्षा जवानांना यश आले. विशेष म्हणजे सरकार आत्मसमर्पणावर ठाम आहे.

तीन राज्यांच्या सीमेवर महाराष्ट्राच्या सीमेपासून ५० किलोमीटर अंतरावर करेगुट्टाचे मोठे पहाड आहे. १० हजार फूट किलोमीटर उंच असलेले करेगुट्टाच्या पहाडाला लागून अबूझमाड आणि इंद्रावती नॅशनल पार्क या दोन माओवाद्यांचेबलस्थानात अलीकडेच सुरक्षा दलांनी प्रवेश करून कॅम्प उभारल्याने काही वर्षापासून माओवाद्यांनी करेगुट्टा लगत असलेल्या परिसरात आपले वास्तव्याचे ठिकाण बनवले होते. या ठिकाणी माओवाद्यांनी एका महिन्यापूर्वी मोठ्या प्रमाणात आयइडीची स्फोटके पेरून ठेवली असल्यामुळे गावकऱ्यांनी या भागात येऊ नये असं पत्र काढलं होतं. मोठ्या प्रमाणात माओवादी या ठिकाणी वास्तव्याला असल्यानेच माओवाद्यांनी हे पत्र काढल्याचे सुरक्षा दलांच्या लक्षात आले त्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार देशातला सगळ्यात मोठं माओवाद विरोधी अभियान या ठिकाणी राबवण्याचा निर्णय छत्तीसगडच्या सुरक्षा दलाने घेतला. यात छत्तीसगड पोलीस डीआरजी यांच्यासह सीआरपीएफ कोब्रा बटालियनचे कमांडो मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. या जवानांची संख्या २९ हजारांच्या जवळपास होती तर या अभियानात पहिल्यांदाच एमआय १७ या वायूदलाच्या हेलिकॉप्टरचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. तसेच या अभियानात अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या ड्रोन चा वापरही करून माओवाद्यांची रेकी करण्याचे प्रयत्न यशस्वी झाले. जवानांनी या पहाडाला घेरण्याचे प्रयत्न सुरू केले. पहिल्याच दिवशी झालेल्या चकमकीत चार माओवादी ठार झाले होते.. दरम्यान गेल्या १६ दिवसांत माओवाद्यांनी पेरून ठेवलेली अडीचशे पेक्षा जास्त आयडीची स्फोटके सुरक्षा दलाने त्याच ठिकाणी निष्क्रिय केली. या दरम्यान दोन जवानांसह तीन सुरक्षा दलाचे या ठिकाणी आयइडीच्या स्फोटात जखमी झाले. तर माओवाद्यांच्या वास्तव्यासाठी असलेली मोठी गुफा ही जवानांनी शोधून काढली होती.. दोन दिवसांपूर्वी अभियानाच्या १५ व्या दिवशी जवान आणि माओवादी यांच्यात मोठी चकमक झाली आणि तब्बल २२ माओवद्यांना कंठस्नान घालण्यात यश आला आहे.

या पहाडावर माओवाद्यांची सर्वात मोठी आक्रमक असलेल्या बटालियनचे नेते हिडमा, देवा तेलंगाणा समितीचा प्रभारी दामोदर यांच्यासह दंडकारण्य झोनल समितीचे नेते आणि हजारच्या जवळपास माओवादी उपस्थित असल्याची सुरक्षा दलांकडे विश्वासनीया माहिती होती. त्यातूनच हे अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्यात आलं होतं. या अभियानावर केंद्रीय गृह मंत्रालयासह देशातल्या सगळ्या वरिष्ठ सुरक्षा एजन्सीची नजर होती.

जवानांनी त्या काळात नीलम शराय आणि धोबी पहाड हे दोन पहाड आपल्या ताब्यात घेतले होते. त्यानंतर करेगटाच्या दिशेने जवानांची आगे कूच सुरू होते. आज १८ वा दिवस असताना ९ रोजी संध्याकाळपासूनच जवानांना परत येण्याचे निर्देश देण्यात आले.

बाह्य सुरक्षेला प्राधान्यभारत-पाक सीमेवर ज्या पद्धतीने थुमचक्री सुरू आहे. ते पाहता सरकारने बाह्य सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सुरक्षा दलांना माघारी येण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती एका वरिष्ठ उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. सीआरपीएफ आणि इतर निमलष्करी दलाचे जवान मुख्यालय परतण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सध्या माओवाद्यांच्या विरोधातलं हे अभियान थांबले असले तरी भविष्यात परत एकदा हे मोठा अभियान सुरू असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली