शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

झेंडेपार लोहाखाणीला नक्षल्यांचा विरोध; प्रवक्ता श्रीनिवासचे पत्रक

By संजय तिपाले | Updated: October 26, 2023 14:41 IST

नक्षलवाद्यांच्या पश्चिम सबझोनल ब्युरो प्रवक्ता श्रीनिवास याच्या नावाने समाज माध्यमावर हे पत्र व्हायरल झाले आहे.

गडचिरोली : कोरची तालुक्यातील प्रस्तावित झेंडेपार लोहखाणीसाठी केवळ ४६ हेक्टरवर उत्खनन करणार असल्याचे कागदोपत्री नमूद आहे. मात्र,  एक हजार हेक्टरवर खाणकाम केले जाणार आहे. यामुळे त्याभागातील पर्यावरण धोक्यात येणार असून या खाणीला आमचा विरोध असल्याचे नक्षलवाद्यांनी पत्रकाच्या माध्यमातून जाहीर केल्याने २६ ऑक्टोबर रोजी खळबळ उडाली आहे. नक्षलवाद्यांच्या पश्चिम सबझोनल ब्युरो प्रवक्ता श्रीनिवास याच्या नावाने समाज माध्यमावर हे पत्र व्हायरल झाले आहे. कोरची तालुक्यातील झेंडेपार टेकडीवरील लोहखाणीत उत्खननाच्या परवानगीसाठी १० ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयात पर्यावरणविषयक जनसुनावणी पार पडली. यावेळी कोरची तालुक्यातील ग्रामसभा आणि स्थानिकांनी विरोध दर्शवला होता. त्यांच्या समर्थनार्थ आता नक्षलवाद्यांनी पत्रक काढले आहे. यात खाणीमुळे पारंपरिक जंगल नष्ट होऊन त्यावर अवलंबून असलेल्या आदिवासींचे जीवन सुद्धा धोक्यात येईल, परिसरातील धार्मिकस्थळ यामुळे प्रभावित होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

प्रशासन कागदोपत्री ४६ हेक्टरवर हे उत्खनन होणार असल्याचे जाहीर करत आहे. मात्र, यात तथ्य नसून प्रत्यक्षात पोलिस बाळाचा वापर करून एक हजार हेक्टरवर उत्खनन करण्याचा प्रशासनाचा डाव असल्याचे म्हटले आहे. यासाठी त्याभागातील मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. सुरजागडनंतर झेंडेपार व नंतर पूर्ण जिल्ह्यात खाणी सुरू करण्याचा कार्पोरेट कंपन्यांचा डाव असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे खाणविरोधी आंदोलनाला आमचा पाठिंबा असल्याचे प्रवक्ता श्रीनिवास याने पत्रकात नमूद केले आहे. 

नक्षल्यांचे उघड आव्हानजिल्हा पोलिसांनी विशेष अभियान राबवून गेल्या काही वर्षांत नक्षल्यांची चळवळ खिळखिळी केली. मागील दोन वर्षांत जिल्ह्यातून नवा सदस्य नक्षल्यांसोबत जोडला गेला नसल्याचा पोलिसांचा दावा आहे. मात्र, या पत्रकात हा दावा खोडून काढत उत्तर गडचिरोलीत आम्ही सक्रिय असल्याचे स्पष्ट करून उघड आव्हान दिले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी डोके वर काढल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी