शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल्यांनी जाळली रस्ता बांधकामावरील १६ वाहने

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2018 21:00 IST

  गडचिरोली - नक्षलवाद्यांकडून रविवारपासून पाळल्या जाणा-या पीएलजीए (पिपल्स लिबरेशन गोरिल्ला आर्मी) सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर एटापल्ली तालुक्यात नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घालत ...

 गडचिरोली - नक्षलवाद्यांकडून रविवारपासून पाळल्या जाणा-या पीएलजीए (पिपल्स लिबरेशन गोरिल्ला आर्मी) सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर एटापल्ली तालुक्यात नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घालत रस्ता बांधकामावर असलेली १६ वाहने जाळली. रस्ता बांधकामाला तसेच सुरजागड लोहखाणीला विरोध म्हणून हे कृत्य करून कोट्यवधी रुपयांची हाणी करण्यात आली. ही घटना शुक्रवारच्या रात्री घडली.

प्राप्त माहितीनुसार, आलापल्लीपासून ११ किलोमीटरवर असलेल्या वट्टेगट्टा ते गट्टेपल्ली या रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत खडीकरणाचे काम एका कंत्राटदार कंपनीकडून सुरू होते. शुक्रवारी हे खडीकरणाचे काम संपणार होते. दरम्यान दुपारी ३.३० च्या सुमारास काही महिला नक्षलींसह ८ ते १० नक्षलवाद्यांनी तिथे येऊन सदर बांधकामावरील मजुरांकडून त्यांच्याकडे असलेले मोबाईल फोन हिसकावून घेतले. त्यानंतर त्या कामाववील १० पोकलॅन, ५ ट्रॅक्टर जेसीबी आणि एक ४०७ मालवाहू वाहन अशी एकूण १६ वाहने रस्त्याच्या कामापासून ३ किलोमीटर लांब रेगडी मार्गावरील जंगलाजवळ नेली आणि त्या वाहनांसाठी टाक्यांमध्ये ठेवलेले डिझेल शिंपडून ती वाहने पेटवून दिली. सायंकाळी ६ पासून रात्री ८ वाजेपर्यंत वाहने पेटविण्याचे काम सुरू होते. त्यामुळे सर्व १६ वाहने पूर्णपणे जळाली. शनिवारी सकाळपर्यंत या वाहनांमधील आग धुमसत होती. यातील काही वाहने राजस्थान पासिंगची होती तर काही महाराष्टÑाची होती. या वाहनांची एकूण किंमत ४ कोटींपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात आले. तत्पूर्वी या नक्षलवाद्यांनी गावात येऊन बैठक घेऊन सदर कामाला विरोध असल्याचे गावकºयांना बजावले. शुक्रवारी सकाळी मजुरांची सुटका झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली.नक्षल्यांच्या कंपनी क्रमांक १० चे हे कृत्य असल्याचे कळते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सकाळी अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, एटापल्लीचे एसडीपीओ किरणकुमार सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी हालेवारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमोल काळे हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली