शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

विलय दिनी घातपाताचा डाव फसला, चकमकीत नक्षल्यांचे शिबिर उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 12:05 IST

भामरागड उपविभागांतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र ताडगाव हद्दीतील मडवेली जंगल परिसरात रविवारी विशेष अभियान पथकाचेे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला.

गडचिरोली: नक्षलवाद्यांकडून विलय दिनाच्या पार्श्वभूमीवर घातपात घडविण्याचा डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात आला. भामरागड तालुक्यातील जंगलात रविवारी झालेल्या चकमकीत नक्षलींचे शिबिर उद्ध्वस्त करण्यात आले. यात कोणीही जखमी झाले नाही, मात्र चकमकीनंतर राबविलेल्या शोधमोहिमेत घातपातासाठी वापरले जाणारे साहित्य पोलिसांच्या हाती लागले.

भामरागड उपविभागांतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र ताडगाव हद्दीतील मडवेली जंगल परिसरात रविवारी विशेष अभियान पथकाचेे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. जवानांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलात पळ काढला. विलय दिनाच्या पार्श्वभूमीवर पेरमिली दलमच्या नक्षलवाद्यांनी आयईडी व कुकर बॉम्ब लावून घातपात करण्याची योजना आखली होती.

आयईडी, कुकर बॉम्ब केले नष्टचकमकीनंतर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले. त्यात घटनास्थळाच्या निरीक्षणावरून अंदाजे ३५ ते ४० नक्षलवादी शिबिर लावून होते असे दिसून आले. त्या ठिकाणावरून आयईडी, कुकर बॉम्ब, पिट्टू बॅग व नक्षल साहित्य पोलिसांच्या हाती लागले. त्यातील आयईडी व कुकर बॉम्ब बॉम्बनाशक पथकाच्या मदतीने जागेवरच नष्ट करण्यात आले.

नक्षलवाद्यांनी केली एकाची गोळी झाडून हत्याएटापल्ली : हेडरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सुरजागड गावातील सोमाजी चैतू सडमेक (५५) या शेतकऱ्याची नक्षल्यांनी गोळी झाडून शनिवारी रात्री हत्या केली. मृतदेहाजवळ एक चिठ्ठीही सापडली असून, त्यात जल, जंगल, जमिनीवर लोकांचा हक्क असल्याचे सांगत सुरजागड लोहखाणीला असलेला विरोध प्रकट करण्यात आला. तीन नक्षल्यांनी रात्री ११ वाजेच्या सुमारास सोमाजी यांच्या घरी जाऊन त्यांना झोपेतून उठविले. त्यांचे हात बांधून गावाबाहेर नेले व गोळी घातली. मृतदेह एटापल्ली ते गट्टा या मुख्य मार्गावर टाकून दिला. मृतदेहाजवळ एक चिठ्ठीही सोडली. 

 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोलीPoliceपोलिस