शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा भीषण हल्ला, तीन जवान जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 18:09 IST

गडचिरोलीत एटापल्ली तालुक्यातील पुलसलगोदी परिसरातील नक्षलवाद्यांनी सुरक्षा जवानांवर हल्ला केला आहे.

गडचिरोलीः जिल्ह्याच्या दुर्गम आणि नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील भागात हिंसक घटनांमुळे मतदान प्रक्रियेत अडथळे आले. एटापल्ली तालुक्यातील कसनसूर पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील वाघेझरी गावच्या शाळेजवळ नक्षलवाद्यांनी सकाळी 11च्या सुमारास भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. गेल्या निवडणुकीपर्यंत त्या शाळेत मतदान केंद्र राहात होते. परंतु अशा घातपाती कारवायांची शक्यता पाहून यावेळी मतदान केंद्र अंगणवाडी केंद्रात ठेवल्याने त्या स्फोटात कोणतीही हाणी झाली नाही. या स्फोटानंतरही गावात मतदान सुरळीत सुरू होते.दुस-या घटनेत हेडरी पोलीस स्टेशनअंतर्गत कोरसलगोंदी या मतदार केंद्रावरील कर्मचारी आणि पोलीस मतदान प्रक्रिया पूर्ण करून ३.१५ वाजता परत हेडरी येथील बेस कॅम्पवर येण्यासाठी पायी निघाले असता गावाजवळच भूसुरुंगाचा स्फोट झाला. त्यात एक जवान जखमी झाला. या घटनेबाबत सविस्तर माहिती मिळू शकली नाही. मतदानाच्या आदल्या दिवशी बुधवारी एटापल्ली तालुक्यातच गट्टा (जांभिया) येथे मतदान केंद्राकडे जात असलेल्या कर्मचा-यांच्या बससमोरील पोलीस कर्मचा-यांना लक्ष्य करून भूसुरूंग स्फोट घडविला होता. त्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. निवडणुकीसाठी चोख पोलीस बंदोबस्त असताना या हिंसक घटनांचे गालबोल कसे लागले याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.गडचिरोली जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर दुपारी ३ पर्यंतच मतदानाची वेळ असल्यामुळे सकाळी ७ वाजतापासून नागरिकांनी मतदानासाठी गर्दी करणे सुरू केले होते. गडचिरोली शहरातील काही केंद्रांवर मतदानाची वेळ संपली तरी गर्दी कमी झालेली नव्हती. दुर्गम भागातील काही ठिकाणच्या अतिसंवेदनशिल मतदान केंद्रांमध्ये ऐनवेळी बदल करण्यात आल्याने मतदारांची तारांबळ उडाली. कडक उन्हामुळे मतदान यंत्र मंद गतीने काम करत असल्याने भर उन्हात मतदारांना रांगेत ताटकळत राहावे लागले.मतदारांचा ट्रॅक्टर उलटला, तीन ठारदेसाईगंज तालुक्यातील डोंगरमेंढा गावातील नागरिक मतदान करण्यासाठी शंकरपूरला ट्रॅक्टरने जात असताना ट्रॉली उलटल्याने तीन जण ठार झाले. याशिवाय ४ जण गंभीर तर १७ किरकोळ जखमी झाले आहे. ही घटना दुपारी १.३० वाजता घडली. या अपघातात यमुना मुरारी मलगाम (६०), हिराबाई मनिराम राऊत (७०), रसिका ईश्वर मरसकोल्हे (६०) अशा तीन वृद्ध महिला ठार झाल्या.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीgadchiroli-chimur-pcगडचिरोली-चिमूरGadchiroliगडचिरोलीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक