शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

हत्याराच्या आकर्षणाने ‘ती’ झाली नक्षलवादी

By admin | Updated: July 28, 2016 02:03 IST

एटापल्ली तालुक्याच्या झारेवाडासारख्या दुर्गम व अतिदुर्गम गावात राहणारी अंकिता ऊर्फ जानकी वत्ते पदा हिच्या गावात

अनेक घटनांत सहभाग : पोलिसांसमोरील आत्मसर्पणातून उघड झाली माहिती गडचिरोली : एटापल्ली तालुक्याच्या झारेवाडासारख्या दुर्गम व अतिदुर्गम गावात राहणारी अंकिता ऊर्फ जानकी वत्ते पदा हिच्या गावात नेहमीच नक्षलवाद्यांचा वावर राहायचा. नक्षलवादी गावात आले की सभा घेऊन गावकऱ्यांना बड्याबड्या बाता द्यायचे. त्यांच्या खांद्यावर लटकविलेले शस्त्र याचे आकर्षण अगदी लहान वयातच अंकिता ऊर्फ जानकीला वाटू लागले. असे शस्त्र आपल्याही हातात यायला हवे, असे तिचे स्वप्न होते. याच स्वप्नाने वाहवत केवळ हत्याराचे आकर्षण म्हणून अंकिता स्वच्छेने दलममध्ये भरती झाली. जुलै २०१० पासून ते मार्च २०१२ पर्यंत ती दलममध्ये कार्यरत राहिली. ती गट्टा दलम, कंपनी क्र. १० व सप्लाय टीममध्ये काम करीत होती. तिने याच काळात तोळगट्टा, नेलगुंडा, कोडसेपल्ली, कांदोळी/बुर्गी, डोकेनटोला व नारगुंडा या चकमकीमध्ये सहभाग घेतला व शस्त्रास्त्रांच्या आकर्षणाच्या भरवशावर बलाढ्य पोलीस यंत्रणेला जेरीस आणण्याचे काम तिने हाती घेतले. याचदरम्यान तिच्या शिरावर दोन लाखांचे बक्षीस पोलीस यंत्रणेने जाहीर केले होते. अखेरीस तिने नक्षलवाद्याच्या या सर्व कारवायांना कंटाळून समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला व तिने गडचिरोलीचे विशेष पोलीस महानिरीक्षक शिवाजी बोडखे व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. त्यांच्या आत्मसमर्पणाने नक्षल चळवळीला मोठा हादरा बसेल, असा विश्वास पोलिसांना आहे. वयाच्या १५ व्या वर्षी ते दलममध्ये झाले दाखल गडचिरोली पोलीस दलामसमोर जागेश ऊर्फ दुल्लुराम जिटीराम हिडको व जीवन ऊर्फ छबीलाल बिपतराम मडावी या दोघांनी आत्मसमर्पण केले. वयाच्या अगदी १५ व्या वर्षी हे दोघेही नक्षल चळवळीत दाखल झाले व माओवादी या दोघांकडूनही पोलिसांची भीती दाखवून भरपूर काम करवून घेत होते, अशी माहिती त्यांनी आत्मसमर्पणानंतर पोलीस दलासमोर विशद केली. जागेशचा जवळजवळ सहा घटनांमध्ये सहभाग होता. देवसूर जंगल परिसरात २०१५ मध्ये झालेली चकमक, मुरूमगाव येथे रेशन धान्य दुकानदाराचा खून, सावरगाव-कोहका मार्गावर दोन इसमाचा खून, मोठा झेलिया येथील कुमोटी नामक पुजाऱ्याला मारहाण, गजामेंढा-सावरगाव मार्गावर पीएलजीए सप्ताहात बॅनर बांधणे, पोस्टर बांधणे आदी घटनांमध्ये जागेश हिडकोचा सहभाग होता. जागेशसारखाच वयाच्या १५ व्या वर्षी जीवन ऊर्फ छबीलाल मडावी हा ही नक्षल दलममध्ये दाखल झाला. त्याचाही परसवाडी चकमक व कुलभट्टी-रामपूर मार्गावर बॅनर, पोस्टर बांधण्याच्या कामात सहभाग होता. ही बाब पोलिसांनी आत्मसमर्पणानंतर स्पष्ट केली आहे.