शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

नक्षल बंदला अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 19:13 IST

तीन आठवड्यांपूर्वी जिल्ह्यातील कसनासूर-बोरियाच्या जंगलात झालेल्या चकमकीत पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर नक्षल्यांना मारल्याचा निषेध म्हणून नक्षल्यांच्या वतीने गुरूवारी (दि.१०) गडचिरोली जिल्हा बंदचे आवाहन केले होते.

गडचिरोली : तीन आठवड्यांपूर्वी जिल्ह्यातील कसनासूर-बोरियाच्या जंगलात झालेल्या चकमकीत पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर नक्षल्यांना मारल्याचा निषेध म्हणून नक्षल्यांच्या वतीने गुरूवारी (दि.१०) गडचिरोली जिल्हा बंदचे आवाहन केले होते. मात्र धानोरा, एटापल्ली व कोरची तालुक्यातील काही भाग वगळता बहुतांश ठिकाणी बंदचा प्रभाव जाणवला नाही. त्यामुळे नागरिकांमधील नक्षली दहशत कमी होत असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र दुसरीकडे प्रथमच गडचिरोली शहरालगत नक्षली बॅनर आणि पत्रके आढळल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.धानोरा तालुक्यातील मुरूमगाव ते सावरगाव, कुलभटी ते गजामेढी या मार्गावर काही ठिकाणी रस्ता आडवा खोदून तसेच रस्त्यावर मोठी झाडे कापून टाकली होती. त्यामुळे छत्तीसगडकडे जाणारी वाहतूक सायंकाळपर्यंत पूर्णपणे ठप्प झाली होती. ८ ते १० ठिकाणी झाडे टाकल्याचे आढळून आले. त्यामुळे प्रवासी वाहनांसह मालवाहू वाहनांना चांगलाच फटका बसला. यादरम्यान मुरूमगावजवळ वाहनांची मोठी रांग लागली होती. काही नागरिकांना नक्षली दहशतीत आणि कडक उन्हात पायीच वाट धरावी लागली. जिल्ह्यात इतरही काही ठिकाणी बंद पाळण्याचे आवाहन करणारे नक्षली बॅनर लागले होते. मुरूमगाव येथे उभ्या असलेल्या काही वाहन चालकांनी सांगितले की, मुरूमगाव-सावरगाव मार्ग पहाटे ३ वाजतापासून बंद आहे. काही वाहन जंगलात तर काही मुरूमगावजवळ उभे होते. वाहनचालकांसह प्रवाशांना खाण्या-पिण्याचे साहित्यही त्या ठिकाणी मिळेनासे झाले होते. मात्र कुलभटी आणि सावरगाव मार्ग बंद असताना दुपारपर्यंत पोलीस किंवा स्थानिक प्रशासनाचे अधिकारी तिथे पोहोचले नव्हते.एटापल्ली ते गट्टा मार्गावरील बससेवा व खासगी वाहतूक बंद होती. एटापल्ली-जारावंडी व इतर मार्ग मात्र सुरू होते. दुकानेही सुरू होती. अहेरी तालुक्यातील बहुतांश व्यवहार सुरू होते. पण रस्त्यांच्या कामावरील कंत्राटदाराची दुर्गम भागातील कामे बंद होती. कोरची येथील आठवडी बाजार बंदच्या दहशतीत उशिरा सुरू झाला. मात्र बाजारात नेहमीप्रमाणे वर्दळ नव्हती.

बॅनरमधून न्यायालयीन चौकशीची मागणीगडचिरोली शहरापासून २ किलोमीटरवर असलेल्या पोटेगाव मार्गावरील पुलाजवळ नक्षली बॅनर आणि पत्रके आढळली. यापूर्वी गडचिरोली शहराच्या आसपास कधीही नक्षली बॅनर, पत्रके आढळली नाहीत. त्यामुळे माओवादी आता जिल्हा मुख्यालयापर्यंत पोहोचले की काय, अशी चर्चा सुरू होती. त्या बॅनवर नक्षल चकमकीची न्यायालयीन चौकशी करण्याची आणि पोलिसांच्या सी-६० कमांडोंना कडक सजा द्यावी, अशी मागणी केली होती.