शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्रास्त्र बनविण्यात पारंगत होता नक्षल नेता रामन्ना, त्याच्यावर होते 25 लाखाचे इनाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2018 19:13 IST

गेल्या ४० वर्षांपासून नक्षल चळवळीत सक्रिय असलेला नक्षल्यांच्या तांत्रिक विभागाचा प्रमुख रामन्ना उर्फ श्रीनिवासी मडरू हा शस्त्रास्त बनविण्यात पारंगत होता.

गडचिरोली - गेल्या ४० वर्षांपासून नक्षल चळवळीत सक्रिय असलेला नक्षल्यांच्या तांत्रिक विभागाचा प्रमुख रामन्ना उर्फ श्रीनिवासी मडरू हा शस्त्रास्त बनविण्यात पारंगत होता. त्याने नक्षल्यांच्या विविध दलममध्ये सेवा दिली आहे. त्यामुळे त्याची अटक हा नक्षल्यांसाठी मोठा हादरा आहे. दरम्यान रामन्नासह त्याची पत्नी पद्माला शनिवारी गडचिरोली जिल्हा न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.गडचिरोलीसह आंध्रप्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेशात नक्षल चळवळीत सेवा देणा-या रामन्ना व पद्मा या दाम्पत्याला शुक्रवारी पहाटे गडचिरोली पोलिसांच्या सूचनेनंतर चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारशहा रेल्वे स्थानकावर अटक झाली होती. प्राथमिक चौकशीनंतर त्यांना दुपारी गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

रामन्ना शस्त्रास्त्र बनविण्यात आणि ते चालविण्यात पारंगत होता. त्यामुळे त्याला अनेक दलममध्ये नक्षल्यांना प्रशिक्षित करण्यासाठी पाठविण्यात आले होते. दंडकारण्य कमिटीशिवाय त्याने कोंडागाव, माल, टिपागड, अहेरी आणि बस्तरच्या जंगलात नक्षल दलममध्ये सेवा दिली आहे. त्यामुळे शासनाने त्याच्यावर २५ लाख रुपयांचे इनाम ठेवले होते. रामन्नाची अटक पोलिसांसाठी मोठे यश आहे. त्याच्या माध्यमातून नक्षल्यांच्या हालचाली आणि त्यांच्याकडील शस्त्रांबद्दलची माहिती मिळू शकते.

अनेक चकमकीत पद्माचा सहभागरामन्नासोबत अटक झालेली त्याची पत्नी पद्मा कोडापे ही १९९२ मध्ये नक्षल चळवळीत सक्रिय झाली. ती टिपागड दलममध्ये कार्यरत होती. धानोरा तालुक्यातील चकमक, २२ मार्च १९९६ ला मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्याच्या डेरीमुरम जंगलातील चकमक, २२ एप्रिल १९९६ ची सिंदेगाव चकमक, १९९८-९९ मधील बस्तर जिल्ह्यातील सिरीवेरामध्ये झालेली चकमक आदींमध्ये तिचा सहभाग होता. तिच्यावर शासनाने ६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. 

सुतारकाम ते नक्षली नेतात्या काळातील दहावी उत्तीर्ण असलेल्या रामन्नाचे वडील सुतारकाम करीत होते. त्यामुळे सुरूवातीला तोसुद्धा याच व्यवसायात होता. मात्र १९९६-७७ मध्ये तो नक्षल चळवळीत दाखल झाला. त्याच्याकडे संघटना बांधणीची जबाबदारी  दिली होती. १९९५ नंतर त्याच्याकडे तांत्रिक विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली. तो दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीत कार्यरत होता. नक्षल चळवळीला वाढविण्यासोबतच शस्त्रास्त्र बनविणे आणि ते चालविण्याचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती. पोलीस अनेक वर्षांपासून त्याचा शोध घेत होते.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी