शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ नक्षल चकमकी बनावट? सत्यशोधन समितीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2018 20:49 IST

गेल्या २२ एप्रिल रोजी भामरागड तालुक्यातील कसनासूर जंगलात तसेच २३ एप्रिल रोजी अहेरी तालुक्यातील राजाराम परिसरात झालेल्या चकमकी बनावट असल्याचा आरोप करीत पोलिसांनी मृतकांची सामूहिक हत्या केली.

गडचिरोली : गेल्या २२ एप्रिल रोजी भामरागड तालुक्यातील कसनासूर जंगलात तसेच २३ एप्रिल रोजी अहेरी तालुक्यातील राजाराम परिसरात झालेल्या चकमकी बनावट असल्याचा आरोप करीत पोलिसांनी मृतकांची सामूहिक हत्या केली, असा आरोप सत्यशोधन समितीच्या सदस्यांनी गडचिरोली येथे पत्रकार परिषदेत सोमवारी दिनांक ७ मे रोजी केला आहे.

सत्यशोधन समितीमध्ये  मानवाधिकार संदर्भात काम करणाऱ्या विविध संघटनाच्या ४४ सदस्यांचा समावेश होता. त्यांनी दोन दिवस गडचिरोली जिल्ह्यात फिरून या चकमकी संदर्भातील सत्य शोधण्याचा प्रयत्न केला. त्यात कसनासूर जंगलात चकमक घडलीच नाही. तर पोलिसांनी मृतकांना चारही बाजुने घेरून त्यांच्यावर हॅन्ड ग्रेनेड व लॉन्चर फेकले. त्याचबरोबर चारही बाजुने फायरींग झाली. मृतकांनी मात्र फायरींग केली नाही. त्यामुळे याला चकमक म्हणणे चुकीचे असून ही एक प्रकारची सामुहिक हत्या आहे, असा आरोप समिती सदस्यांनी केला. जे लोक मारले गेले, त्यामध्ये काही गावकऱ्यांचासुध्दा समावेश आहे. पोलिसांनीसुध्दा त्यांना बेपत्ता दाखविले आहे. २२ एप्रिलच्या चकमकीत नक्षल कमांडर नंदू व त्याच्या इतर सहा साथीदारांना पोलिसांनी जिवंत पकडले व नंदूकडून नक्षल्यांनी राजाराम जंगलात साठवून ठेवलेला पैसा शोधून काढल्यानंतर त्याच्यावर व इतर साथीदारांवर गोळ्या झाडल्याचे समितीचे सदस्य म्हणाले. ४० मृतदेहांपैकी केवळ दोघांच्या शरीरात बंदुकीच्या गोळ्या आढळल्याचे डॉक्टरांनी समिती सदस्यांना सांगितल्याचे ते म्हणाले. बोरीया गावातील नागरिक पोलिसांच्या प्रचंड दबावात आहेत. त्यामुळे ते बोलण्यास तयार नसल्याचे सांगितले. सदर चकमक बनावट असून पोलिसांनी संबंधिताची निघृण हत्या केली आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह संबंधित पोलिसांवर भादंवि कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करावा. या प्रकरणाची न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे, अशी माहिती समिती सदस्यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

पत्रकार परिषदेला आशिष गुप्ता, एन. नारायणराव, व्ही. रघुनाथ, क्रांती चैतन्य, एन. गंगाधर, डॉ. महेश कोपुलवार, अमोल मारकवार, जि.प. सदस्य अ‍ॅड. लालसू नागोटी यांच्यासह सर्वच सदस्य उपस्थित होते.या आरोपांसंदर्भात पोलीस उपमहानिरिक्षक अंकूश शिंदे यांच्याशी संपर्क केला असता, हे आरोप बिनबुडाचे असून सत्यावर आधारीत नसल्याचे सांगितले. मृत नक्षल्यांच्या शरीरात बंदुकीच्या गोळ्या आढळल्या असून तसा शवविच्छेदन अहवालही असल्याचे सांगितले.

नक्षल पीडितांची नारेबाजीसत्यशोधन समितीचे सदस्य भामरागड तालुक्यातील बोरीया या गावात गेले असता, नक्षल पीडित कुटुंबांनी या सत्यशोधन समितीचा निषेध केला. मागण्यांचे निवेदन सुध्दा सत्यशोधन समितीला सादर केले. नक्षल्यांकडून अनेक नि:ष्पाप नागरिकांची हत्या केली जाते. त्यावेळी सत्य शोधण्याचा प्रयत्न या समितीकडून का केला जात नाही, असा प्रश्न नक्षल पीडित नागरिकांनी उपस्थित केला.

या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यामुळे जे सत्य आहे ते समोर येईलच. त्यानुसार कारवाई केली जाईल. सोबतच एनएचआरसीला रिपोर्ट पाठविल्या जाईल.- डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक, गडचिरोली