शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल कमांडरच्या वडिलांनी काढली जिवंत मुलाची अंत्ययात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2018 19:50 IST

आपल्या मुलाने नक्षल चळवळीत सहभागी होऊन अनेक निष्पाप लोकांचा बळी घेतला.

एटापल्ली (गडचिरोली) : आपल्या मुलाने नक्षल चळवळीत सहभागी होऊन अनेक निष्पाप लोकांचा बळी घेतला. त्याच्या या कृत्यामुळे तो नक्षल चळवळीत असेपर्यंत आपल्यासाठी मेला आहे, असे सांगत नक्षल कमांडर महेश उर्फ शिवाजी रावजी गोटा या नक्षल कमांडरच्या वडिलांनी शुक्रवारी येथे त्याची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. यात बरेच लोक सहभागी झाले होते.२८ पासून सुरू होत असलेल्या नक्षलींच्या शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर एटापल्ली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीने २५ ते २७ दरम्यान जनमैत्री मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात सहभागी नागरिकांनी नक्षलवाद्यांमुळे नाहक त्रास होत असल्याची भावना व्यक्त केली. त्यामुळे रेगडीगुट्टा येथील रहिवासी असलेले नक्षल कमांडर महेशचे वडील रावजी गोटा यांनी मुलाच्या कृत्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी त्याचा पुतळा तयार करून प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली.ही अंत्ययात्रा महसूल मंडळ कार्यालयापासून मुख्य मार्गाने निघून शिवाजी चौकात पोहोचली. तिथे नक्षल कमांडर महेश आणि नक्षल डिव्हीजन कमांडर जोगन्ना उर्फ घिसू उर्फ चिमला उर्फ नरसय्या लिंगय्या रा. करीमनगर यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांनी नक्षलवाद मुर्दाबाद, लोकशाही जिंदाबाद अशा घोषणाही दिल्या. मुलगा महेश याने नक्षल चळवळीतून बाहेर येऊन आत्मसमर्पण करावे आणि सामान्य जीवन जगावे, अशी भावना त्याचे वडील रावजी गोटा यांनी व्यक्त केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन जगताप व एटापल्ली ठाण्याच्या पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी