शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलपीडित कुटुंबियांनी रॅलीतून दिला शांततेचा संदेश  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 18:05 IST

शहरातील मुख्य इंदिरा गांधी चौकात जिल्हयातील ३५० ते ४०० नक्षलपीडित व शहिद कुटुंबीयांनी गांधी जयंतीच्या पर्वावर सोमवारी गडचिरोली शहरात अहिंसा  रॅली काढली. नक्षल्यांनी आदिवासींच्या केलेल्या हत्येच्या निषेधार्थ नक्षलवाद मुर्दाबाद च्या घोषणा देत धरणे आंदोलन करुन व रॅली काढून नक्षल्यांकडून होणाऱ्या त्रासाबाबत तसेच पिळवणुकीबाबत तहसीलदाराना निवेदन दिले.

गडचिरोली - शहरातील मुख्य इंदिरा गांधी चौकात जिल्हयातील ३५० ते ४०० नक्षलपीडित व शहिद कुटुंबीयांनी गांधी जयंतीच्या पर्वावर सोमवारी गडचिरोली शहरात अहिंसा  रॅली काढली. नक्षल्यांनी आदिवासींच्या केलेल्या हत्येच्या निषेधार्थ नक्षलवाद मुर्दाबाद च्या घोषणा देत धरणे आंदोलन करुन व रॅली काढून नक्षल्यांकडून होणाऱ्या त्रासाबाबत तसेच पिळवणुकीबाबत तहसीलदाराना निवेदन दिले.        देशात एखाद्या व्यक्तीचा खून झाला तर देशभरातील विचारवंत आठवडाभर चर्चा करतात. येथे ४९१ निष्पाप आदिवासी बांधवांचा खुन करुनही तथाकथित विचारवंतांना आमचे दु:ख व अश्रु दिसत नाहीत का? असा खडा सवाल नक्षलपिडीत कुटुंबियांनी निवेदनामध्ये केला आहे. तसेच मानवाधिकार आयोगाला आमचे दु:ख व अश्रु दिसत नाहीत. आमच्या १५ वर्षाच्या मुलामुलींच्या हाती बळजबरी शस्त्र देवून देशविघातक कृत्य करण्यास भाग पाडणाऱ्या या नक्षल विचारवंतांना प्रश्न विचारण्याचे धाडस तथाकथित मानवाधिकार रक्षक का करत नाहीत? असाही सवाल नक्षलपिडीत कुटुंबियांनी केला आहे.       नक्षल्यांनी आतापर्यंत अनेक शाळा पाडल्या, मुलांचे शिक्षण रोखले. शासनाच्या महाराष्ट् दर्शन सहलीच्या माध्यमातुन राज्यातील इतर जिल्हयांची झालेली प्रगती पाहणाऱ्या आमच्या मुलांनी सहलीला जावू  नये म्हणून धमकावणारे नक्षलवादी हे स्वत:च्या मुलांना मात्र मोठया विद्यापिठात शिकवत आहेत ही वस्तुस्थिती त्यांनी मांडली. तसेच नक्षलवादी हे गोरगरीब आदिवासींच्या मजुरीचा पैसा खंडणी म्हणून गोळा करतात  व वाळू, खनिज, रिअल इस्टेट मध्ये स्वत:च्या फायद्यासाठी गुंतवतात ही वास्तव व विदारक परिस्थितीही सर्व कुटुंबीयांनी मांडली.        याचबरोबर जिल्हयात अौद्योगिक प्रकल्प व दळणवळण सुविधा उभारून आदिवासी बांधवांचा खऱ्या अर्थाने विकास करावा, अशी मागणी देखील यावेळी नक्षलपीडित कुटुंबीयांनी प्रशासनाकडे केली.