शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

जंगलातील नैसर्गिक पाणवठे कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 00:32 IST

जंगलातील वन्यप्राण्यांचे क्षेत्र अबाधित राहावे, त्यांना मुक्तपणे भ्रमण करता यावे, वन्यजीवांना आपली तहान भागविण्यासाठी लोकवस्तीकडे धाव घ्यावी लागू नये, या उद्देशाने आरमोरी वन परिक्षेत्रातील वन क्षेत्रात ज्या ठिकाणी वन्यजीवांचा वावर आहे,.....

ठळक मुद्देखोदतळ्यात टंँकरद्वारे पाणीसाठा : वन विभागाकडून वन्यजीवांसाठी केली जात आहे सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : जंगलातील वन्यप्राण्यांचे क्षेत्र अबाधित राहावे, त्यांना मुक्तपणे भ्रमण करता यावे, वन्यजीवांना आपली तहान भागविण्यासाठी लोकवस्तीकडे धाव घ्यावी लागू नये, या उद्देशाने आरमोरी वन परिक्षेत्रातील वन क्षेत्रात ज्या ठिकाणी वन्यजीवांचा वावर आहे, अशा ठिकाणी खोदतळ्यात व कोरडे पडलेल्या पाणवठ्यात वन विभागामार्फत टँकरद्वारे पाणीसाठा केला जात आहे.आरमोरी वन परिक्षेत्रातील अरसोडा, कासवी, रवी, वैरागड, डोंगरतमाशी व इतर वनक्षेत्रात साधारणपणे ज्या ठिकाणी वन्यप्राण्यांचा वावर आहे, त्या परिक्षेत्रातील नैसर्गिक पाणवठ्यात तसेच स्वनिर्मित खोदतळ्यात आरमोरी वन परिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी टँकरद्वारे पाणीसाठा करीत आहेत. वाढत्या तापमानात वन्यजीवांची यातून पाण्याची व्यवस्था होत आहे. जंगलात पाणीसाठा उपलब्ध नसल्याने वन्यजीव तहाण भागविण्यासाठी लोकवस्तीकडे धाव घेतात आणि त्याची शिकार केली जाते. हे टाळण्यासाठी आरमोरी वन परिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जंगलात पाणी मिळत नसल्याने त्याच ठिकाणी वन्यजीवांचा तडफडून मृत्यू होत असल्याच्या घटना घडत आहेत. असे असले तरी वनाधिकारी व कर्मचारी गॅस कनेक्शन वाटप करणे, तेंदू बोनसचे वाटप करणे व मानवीकृत रोपवाटीकांचे बोगस बिल पाठविण्यात व्यस्त आहे.आरमोरी वन परिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे वन्यजीवांना संजीवनी मिळत आहे. यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती करावी लागत नाही. अशा प्रकारचा अभिनव उपक्रम गडचिरोली जिल्ह्याच्या पाचही वन विभागात यंदा राबविण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. कारण गडचिरोली जिल्ह्यात सध्या उष्णतेचा पारा ४२ अंशावर पोहोचला आहे. नदी, नाले, तलाव, बोड्या, वनतलाव, खोदतळे पूर्णत: आटले असल्याने जनावरांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.आरमोरी वन परिक्षेत्रातील जे नैसर्गिक पाणवठे आहे, ते पूर्णत: कोरडे पडले आहे. दिवसेंदिवस उष्णतामान वाढत असल्याने वन्यप्राण्यांनाही पाणी मिळणे कठीण झाले आहे. पाण्याशिवाय वन्यप्राण्यांचा जीव जाऊ नये, यासाठी ज्या ठिकाणी वन्यप्राण्यांचा वावर आहे. त्या ठिकाणच्या खोदतळ्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे वन्यजीवांना पिण्यासाठी पाणी सुविधा होत आहे.- एच. जी. बारसागडे,वन परिक्षेत्राधिकारी, आरमोरी

टॅग्स :forest departmentवनविभाग